घरमुंबईजनतेचे प्रेम हाच माझा आत्मविश्वास

जनतेचे प्रेम हाच माझा आत्मविश्वास

Subscribe

आमदार हितेंद्र ठाकूर यांनी व्यक्त केली भावना

विजया दशमीच्या मुहूर्तावर सर्वच उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. काही उमेदवारांनी रॅली आणि मतदारांच्या भेटीगाठींवर भर दिला आहे, तर काहींनी सोशल मीडियावर प्रचार सुरू केला आहे. आमदार हितेंद्र ठाकूर यांनी मात्र मतदारसंघाच्या प्रत्येक बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. लोकांचे प्रश्न आणि अडचणी ऐकून त्यावर योग्य ती कार्यवाही करणे, तसेच जी कामे आचारसंहितेच्या काळात करणे शक्य होणार नाही त्या समस्या निवडणुकीनंतर सोडवू, असे स्पष्ट आश्वासन ते देत आहेत.

त्यांच्या या उपक्रमाला स्थानिक जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. त्यानंतर घरोघरी जाऊन ते प्रत्यक्ष मतदारांना साकडे घालणार आहेत. दोन्ही मतदारसंघांचा प्रचार ते एकहाती राबवत आहेत. याविषयी आमदार ठाकूर म्हणाले की, आगे आगे देखो, होता है क्या? इतका आत्मविश्वास ते व्यक्त करत आहेत. ते केवळ लोकांचे प्रेम आणि आपुलकीच्या बळावर, जिंकणार तर मीच, पण मला मताधिक्याचा भूतो न भविष्यती असा विक्रम करायचा आहे, असे विश्वास ते व्यक्त करत आहेत.

- Advertisement -

आमदार हितेंद्र ठाकूर यांच्यासोबत हजारो पदाधिकारी आणि कार्यकर्ते त्यांच्या दिमतीला असतात. कार्यकर्त्यांच्या बळावर आपण या दोन्ही निवडणुका प्रचंड आत्मविश्वासाने जिंकू, असा आत्मविश्वास त्यांच्या बोलण्यातून सतत जाणवत असतो. नियोजनबद्ध आखणी व मतदारांशी थेट संवाद, या दोन कारणांमुळे प्रचारात ते आजच्या घडीला आघाडीवर आहेत. विरोधकांची निवडणूक स्ट्रॅटेजी ते कशा पद्धतीने राबवतात, याकडे लक्ष न देता ‘मी व माझा मतदार’ हे त्यांचे तंत्र अत्यंत प्रभावी अस्त्र ठरले आहे. गेल्या ३० वर्षात केलेली विकासकामे व भविष्यातील प्रस्तावित जनकल्याणाच्या योजना यावर त्यांच्या प्रचाराचा भर असतो. थेट आमदारच आपल्याशी संवाद साधतो. हे पाहून मतदारही सुखावले जातात. विरोधी पक्षाच्या उमेदवारावर एक चकार शब्द न काढणारे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी प्रचाराच्या पहिल्या फेरीतच अन्य उमेदवारांच्या तोंडाला फेस आणला आहे.

त्यामुळे ठाकूर यांच्या कार्यकर्त्यांचा मात्र विश्वास दुणावला असून ते त्यांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्यासाठी दिवसरात्र मेहनत करत आहेत. पैशांच्या जोरावर नाही तर लोकांचे प्रेम, स्नेहबंध व आपुलकीच्या जोरावर मी पुन्हा वसईकर जनतेच्या ह्यदयात स्थान मिळवले व ते ३० वर्षे ते टिकवले त्याचीच पुनरावृत्ती या खेपेस होणार असल्याचे ते आवर्जून सांगतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -