घरमुंबईजामिनाचा अर्ज फेटाळला; नामदेव भगत फरार

जामिनाचा अर्ज फेटाळला; नामदेव भगत फरार

Subscribe

अलिबाग सेशन कोर्टाने दिलेला अंतरिम जामीन फेटाळल्याने त्याच्या अडचणीत वाढ झाली

नवी मुंबई : शिवसेना कार्यकर्ता मेळाव्याच्या दिवशीच विनयभंगाचा गुन्हा दाखल असलेले शिवसेना नगरसेवक, सिडकोचे माजी संचालक आणि शिवसेनेचे गोवा राज्य सहसंपर्कप्रमुख नामदेव भगत याला अलिबाग सेशन कोर्टाने दिलेला अंतरिम जामीन फेटाळल्याने त्याच्या अडचणीत वाढ झाली आहे.

कोणत्याही क्षणी अटक होण्याच्या भीतीने नामदेव भगत याने पळ काढला आहे. भाजप आमदार राम कदम यांच्यानंतर आता नामदेव भगत याच्या विनयभंग प्रकरणाची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. राम कदमा यांच्यावर सडकून टीका करणारी शिवसेना आता नामदेव भगत यांच्याबाबत कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ६ सप्टेंबर (गुरूवारी) रोजी झालेल्या सुनावणीनंतर भगत यांचा जामीन अर्ज रद्द केला आहे.

- Advertisement -

उरणमधील दिघोडी फार्म हाऊसवर नेऊन एका १९ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी नामदेव भगत याच्यावर २१ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी नामदेव भगत याने २१ ऑगस्ट रोजी अलिबाग सेशन कोर्टात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. त्यावेळी कोर्टाने त्याला अंतरिम जामीन मंजूर करुन ६ सप्टेंबर रोजी जामीनावर सुनावणी ठेवली होती.

जामीन अर्ज फेटाळला

अंतरिम जामीन रद्द झाल्याने फरार आरोपी नामदेव भगत याचा नवी मुंबई पोलीस शोध घेत आहेत. पिडीत मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरुन ३५४ कलमान्वये उरण पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सेशन कोर्टाने भगतला दिलेला अंतरिम जामीन रद्द करत जामीन अर्ज फेटाळला. दरम्यान, नामदेव भगत यांना कोणत्याची क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. पोलीस भगतच्या शोधात आहेत.

- Advertisement -

सेना अडचणीत

नामदेव भगतप्रकरणामुळे शिवसेना चांगलीच अडचणीत आली आहे. नवी मुंबईतील शिवसेना नगरसेवक नामदेव भगतप्रकरणी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवसेनेचा आणखी एक मातब्बर नेता, विनयभंगप्रकरणात जामिनावर बाहेर आहेत. त्याचीही फाईल लवकरच उघडणार असल्याची नवी मुंबईच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -