घरमुंबईएनसीबीचे डीडीजी ज्ञानेश्वर सिंह यांची बदली, आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाचा केला होता...

एनसीबीचे डीडीजी ज्ञानेश्वर सिंह यांची बदली, आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाचा केला होता पर्दाफाश

Subscribe

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (NCB) डीडीजी आणि मुंबई झोन आणि गोव्याचे प्रभारी ज्ञानेश्वर सिंह यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आता सचिन जैन यांची महाराष्ट्र- गोवा एनसीबी प्रभारी नियुक्ती करण्यात आली आहे. बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान याला क्रुझ ड्रग्स प्रकरणात एनसीबीचे तत्कालीन विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी अटक केली होती. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी हा पूर्वनियोजित कट असल्याचे सांगत या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली. दरम्यान याप्रकरणाचा तपास आयआरएस समीर वानखेडे आणि त्यांच्या टीमने केला होता. मात्र त्यांच्या तपासावर अनेक प्रश्न उपस्थित झाले. ज्यानंतर दिल्ली एनसीबीने या अंतर्गत तपासासाठी ज्ञानेश्वर सिंह यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन केली होती. यावेळी ज्ञानेश्वर सिंह यांनी आयआरएस समीर वानखेडे आणि त्यांच्या टीमची चौकशी केली होती.

अलीकडेच त्यांनी या चौकशीचा अहवाल सादर केला आहे. यावेळी आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात समीर वानखेडेच्या तपासातील अनेक त्रुटी ज्ञानेश्वर सिंह यांनी उघड केल्या होत्या. परिणामी आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात क्लीन चिट देण्यात आली. (Narcotics Control Bureau ddg dnyaneshwar singh transfer sameer wankhede aryan khan drugs case)

- Advertisement -

यावेळी ज्ञानेश्वर सिंह यांनी आपल्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचे वानखेडे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आयोगासमोर सांगितले होते. ज्ञानेश्वर सिंह यांच्या अहवालानंतर मुंबई एनसीबीच्या 8 अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली आहे. ज्ञानेश्वर सिंह हे महाराष्ट्र आणि गोव्याच्या NCB चे DDG आहेत. आता त्यांची उत्तर भारतात बदली करण्यात आली आहे.

ज्ञानेश्वर सिंह यांच्याकडे आता जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, गुजरात, चंदीगड, लडाख, मध्य प्रदेश, राजस्थान, दीव-दमण आणि दादरा नगर हवेलीची जबाबदारी असेल. ज्ञानेश्वर सिंग यांच्या जागी सचिन जैन हे महाराष्ट्र आणि गोव्याचे NCB DDG म्हणून काम पाहतील.

- Advertisement -

आर्यन खान क्रुझ ड्रग्स प्रकरण नेमकं काय आहे?

मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कॉर्डेलिया क्रूझवरून आर्यन खानला ड्रग्स प्रकरणात ‘नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) ऑक्टोबर 2021 मध्ये अटक केली होती. क्रूझवर आर्यन खानकडे ड्रग्ज सापडल्याचा आरोप एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे आणि इतर अधिकाऱ्यांनी केला होता. प्रकरणी आर्यन खान अनेक दिवस कोठडीत होता. मात्र न्यायालयाने सुनावणीत आर्यन खानला जामीन दिला. यात अलीकडेच एनसीबीने आर्यन खानला क्लीन चीट दिली आहे.


दिल्लीच्या नरेलामध्ये प्लास्टिक फॅक्टरीला भीषण आग; दोघांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -