घर मुंबई राष्ट्र पहिले हीच भाजपाची निती; भाजपा नेते सी. टी. रविंचे प्रतिपादन

राष्ट्र पहिले हीच भाजपाची निती; भाजपा नेते सी. टी. रविंचे प्रतिपादन

Subscribe

पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक क्षण देशासाठी समर्पित केला आहे. त्यामुळे दुसऱ्यांदा पुन्हा नरेंद्र मोदी यांना मतदान करून पंतप्रधान केले. जनता हेच त्यांचे कुटूंब आहे, असेही सी. टी. रवी यावेळी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला यशस्वी 9 वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त राज्यात ‘मोदी@9’ हे महाजनसंपर्क अभियान राबविले जात आहे. या अभियानांतर्गत उत्तर मुंबई जिल्ह्याच्यावतीने कांदिवली येथे भाजपा ज्येष्ठ कार्यकर्ता संवाद आणि प्रबुद्ध वर्ग संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात राष्ट्र पहिले हीच भाजपाची निती असल्याचे प्रतिपादन भाजपा राष्ट्रीय सरचिटणीस व महाराष्ट्र प्रभारी सी. टी. रवी यांनी केले.

हेही वाचा – Odisha Train Accident : रेल्वे अपघातावरून राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका, म्हणाले…

- Advertisement -

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना सी. टी. रवी म्हणाले की, समाजात प्रबुद्ध वर्गही आहे आणि दुर्बूध्द असणारे लोकही आहेत. फक्त नियतीची गरज आहे. भाजपाकडे नितीही आहे, नेताही आहे आणि नियतही आहे. भाजपाची निती आणि इतर राजकीय पक्षांच्या नितीमध्ये फरक आहे. राष्ट्र पहिले ही आपली निती आहे. नरेंद्र मोदी यांनी 2014 साली लोकसभा निवडणुकीवेळी देशासमोर गुजरातच्या विकासाचे मॉडेल ठेवले. त्यावर जनतेने विश्वास ठेवून मतदान केले. पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक क्षण देशासाठी समर्पित केला आहे. त्यामुळे दुसऱ्यांदा पुन्हा नरेंद्र मोदी यांना मतदान करून पंतप्रधान केले. जनता हेच त्यांचे कुटूंब आहे, असेही सी. टी. रवी यावेळी म्हणाले.

या अभियानाचे मुख्य संयोजक आमदार प्रविण दरेकर यांनी यावेळी बोलताना म्हटले की, हे अभियान एवढ्यासाठी आहे की आपल्या देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखा नेता लाभला व 9 वर्षात आपल्या देशाचे नाव जगाच्या पाठीवर झळकावण्याचे काम मोदी यांनी केले आहे. ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. त्यामुळे 9 वर्षाची कारकीर्द जनतेसमोर नीट जावी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशासाठी केलेली विकासकामे, केलेले प्रकल्प, योजना, विविध समाज घटकांसाठी केलेली कामं ही तळागाळापर्यंत पोहोचावी म्हणून हे अभियान देशभर सुरु आहे. आज सर्व देश पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारताकडे वेगळ्या नजरेने पाहत आहेत. यात पंतप्रधान मोदींचे अपारकष्ट आहेत. म्हणून आज जो वर्ग नेहमी भाजपाच्या मागे उभा राहिलाय किंबहुना मोदी पंतप्रधान झाल्यानंतर, नेतृत्व केल्यानंतर समाजातील जो बुद्धीजीवी वर्ग आहे तो मोदींच्या नेतृत्वावर प्रभावित आहे. त्यामुळे जनतेचे काय म्हणणे आहे हे जाणून घेण्यासाठी अशा प्रकारचा कार्यक्रम देशभर पक्षाच्यावतीने सुरु आहे.

- Advertisement -

या प्रसंगी केंद्रीय संसदीय बोर्डाच्या सदस्या डॉ. सुधा यादव, खासदार गोपाळ शेट्टी, आमदार सुनील राणे, आमदार योगेश सागर, अभियानाचे सहसंयोजक कृपाशंकर सिंग, भाजपा वरिष्ठ पदाधिकारी जयप्रकाश मिश्रा, महाराष्ट्र भाजपा सचिव ॲड. अखिलेश चौबे, मुंबई भाजपा उपाध्यक्ष प्रकाश दरेकर, मुंबई भाजपा महामंत्री संजय उपाध्याय, मुंबई भाजपा सचिव विनोद शेलार, मुंबई भाजपा प्रवक्ता राणी दिवेदी, उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्ष गणेश खणकर, उत्तर मुंबई जिल्हा महामंत्री बाबा सिंग आदी मान्यवर उपस्थित होते.

- Advertisment -