घरक्राइमसुशांतसिंह राजपूत ड्रग्स प्रकरणात NCB कडून हरीश खानला अटक

सुशांतसिंह राजपूत ड्रग्स प्रकरणात NCB कडून हरीश खानला अटक

Subscribe

अटक करण्यात आलेल्या हरीशकडे मोठ्या प्रमाणात एमडी मिळून आला आहे.

नारकॉटिक्स कंट्रोल ब्युरोकडून (NCB) मंगळवारी रात्री वांद्रे परिसरात एका फ्लॅटवर छापा टाकून दोन भावांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या दोन्ही भावांवर मुंबईतील विविध पोलीस स्थानकांत अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती एनसीबीने दिली आहे. याप्रकरणी एनसीबीने हरीश खान याला अटक केली असून त्याचा भाऊ साकिब याला वांद्रे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. अटक करण्यात आलेल्या हरीशकडे मोठ्या प्रमाणात एमडी मिळून आला आहे. सुशांतला ड्रग्स देण्यासाठी सिद्धार्थ पिठानी हा हरीशकडून ड्रग्स मिळवायचा असा संशय एनसीबीला आहे.

सुशांतसिंह राजपूत यांना ड्रग्स पुरवणारा त्याचा रूममेट सिद्धार्थ पिठानी याला एनसीबीने हैदराबाद येथून नुकतीच अटक केली. सिद्धार्थच्या चौकशीत अनेक ड्रग्स पेडलर्सची नावे समोर येत असून त्यापैकी हरीश खान हा एक असल्याची माहिती एनसीबीला मिळाली होती. एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांनी आपल्या पथकासह वांद्रे रिक्लेमेशन येथील एका सोसायटीतील एका फ्लॅटमध्ये छापा टाकून हरीश खान आणि त्याचा भाऊ साकिब खान या दोघांना ताब्यात घेतले.

- Advertisement -

हरीश आणि साकिब या भावांवर विविध पोलीस स्थानकांत सुमारे २१ गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचे चौकशीत समोर आले आहे. तसेच वांद्रे पोलिसांनी साकिबला नुकतीच तडीपारची नोटीसदेखील बजावली होती. एनसीबीने साकिब याचा ताबा वांद्रे पोलिसांना दिला असून हरीशला एनसीबीने अटक केली आहे.

अटक करण्यात आलेला हरीश खान हा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि माया डोळस यांसारख्या गुंडांचा प्रचंड चाहता आहे. एनसीबीला हरीशच्या मोबाइल फोनमध्ये खुंखार गुंडांचे अनेक फोटो सापडले आहेत, जे त्याने स्वत:च्या छायाचित्रांमध्ये विलीन केले आहेत. हरीशचे सुशांतसिंह ड्रग्स प्रकरण, तसेच चिंकू पठाण प्रकरणात नाव समोर आले आहे अशी माहिती समीर वानखेडे यांनी दिली. एनसीबीला हरीशच्या मोबाईलमध्ये घातक शस्त्राची छायाचित्रेही मिळाली, पण ही शस्त्रे हरीशच्या घरात मिळून आलेली नाही. त्याने ही शस्त्रे लपवल्याचा संशय आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -