घरमुंबईराष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी केली नव्या दौऱ्यांची घोषणा, या भागातून करणार...

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी केली नव्या दौऱ्यांची घोषणा, या भागातून करणार सुरुवात

Subscribe

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी परिवार संवाद दौरा केला होता. या दैऱ्याचा समारोप कोल्हापुरात झाला. यानंतर नव्या दौऱ्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. याबाबत ट्विट राष्ट्रवादी काँग्रेसच्या ट्विटर वरून करण्यात आले आहे. 

ट्विटमध्ये काय –

- Advertisement -

या ट्विटमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या ‘राष्ट्रवादी परिवार संवाद’ दौऱ्याला पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अभूतपूर्व असा प्रतिसाद दिला. यानंतर पुन्हा एकदा मा. प्रदेशाध्यक्ष हे पश्चिम विदर्भापासून पक्ष संघटनेचा आढावा दौरा सुरु करत आहेत, असे म्हटले आहे.

- Advertisement -

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्यात ‘राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा’ काढली होती. त्यानी विधानसभा मतदारसंघानिहाय त्यांनी पदाधिकाऱ्यांकडून आढावा घेतला होता. या यात्रेत पदाधिकाऱ्यांनी केलेल्या सूचना, प्रदेशाध्यक्ष म्हणून पाटील यांनी नोंदवलेल्या होत्या. या यात्रेची सांगता कोल्हापुरातील तपोवन मैदानावर झाली. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसने संघटनेचा आढावा दौरा सुरु केला आहे.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -