घरताज्या घडामोडीनाहूरमध्ये सायन नायरच्या धर्तीवर आधुनिक रुग्णालय उभारण्यात येणार

नाहूरमध्ये सायन नायरच्या धर्तीवर आधुनिक रुग्णालय उभारण्यात येणार

Subscribe

मुंबई महापालिका केईएम, नायर, सायन या तीन प्रमुख रुग्णालयांच्या धर्तीवर भांडुप, नाहूर येथे ६७० कोटी रुपये खर्चून आधुनिक व सर्व सोयीसुविधांनी युक्त रूग्णालय उभारणार आहे. आगामी ३ वर्षात नाहूर येथे तळमजला अधिक दहा मजली आणि ३६० बेड्सचे रूग्णालय उभारण्यात येणार आहे.

हे रूग्णालय उभारल्यानंतर भांडुप, मुलुंड, ठाणे,ऐरोली, कांजूरमार्ग, विक्रोळीपर्यन्तच्या रुग्णांना केईएम, सायन अथवा नायर रुग्णालयात दूरवर विविध आजारांवर औषधोपचार घेण्यासाठी जावे लागणार नाही. त्यांना नवीन रुग्णालयात चांगले उपचार मिळण्यास मदत होणार असून मोठा दिलासा मिळणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव स्थायी समितीच्या आगामी बैठकीत मंजुरीसाठी येणार आहे. सदर रुग्णालयाच्या उभारणीवरील ६७० कोटींच्या खर्चावरून भाजप व विरोधी पक्षाच्या सदस्यांकडून आक्षेप घेतला जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

- Advertisement -

हे रूग्णालय उभारण्यासाठी पालिकेने अंदाजित केलेल्या खर्चाच्या २७% अधिक रक्कम आहे. मात्र गेल्या तीन वर्षात बांधकाम साहित्याचे वाढलेले दर पाहता कंत्राटदाराने खर्चात २७% वाढ मागितली आहे. त्यामुळेच या रूग्णालय उभारणीचा खर्च ६७० कोटींवर ( सर्व कर अंतर्भूत) जाणार आहे. सदर रुग्णालयात एसी, अग्निरोधक यंत्रणा, मेडिकल गॅस सिस्टीम, मॉड्युलर ओटी सिस्टीम, न्यूमॅटिक ट्रान्सपोर्ट सिस्टीम, यांत्रिकी, विद्युत कामे करण्यात येणार आहेत.


हेही वाचा : Dreams mall fire : ड्रीम्स मॉलमधील भीषण आगीची होणार चौकशी, आगीमागे संशयाचा धूर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -