घरमहाराष्ट्रपुणेNilesh Rane : नीलेश राणेंना पुणे महापालिकेचा दणका; कर चुकविल्याप्रकरणी कारवाई

Nilesh Rane : नीलेश राणेंना पुणे महापालिकेचा दणका; कर चुकविल्याप्रकरणी कारवाई

Subscribe

पुण्यामधील डेक्कन भागात असलेल्या आर डेक्कन व्यवसायिक जागेचा कर न भरल्याने माजी खासदार नीलेश राणे यांच्या जागा पालिकेकडून सील करण्यात आली आहे. महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने मालमत्ता थकबाकी प्रकरणी ही मोठी कारवाई केली आहे.

पुणे : राज्यातील राजकारणात चर्चेत राहणाऱ्या राजकीय परिवारापैकी एक असलेल्या राणे कुटुंबातील माजी खासदार नीलेश राणे यांना पुणे महानगरपालिकेने दणका दिला आहे. नीलेश राणे यांनी कर चुकविल्याप्रकरणी त्यांच्या पुण्यातील मालमत्तेवर महापालिकेने कारवाई केली आहे. मार्च एंडमुळे ही कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे. (Nilesh Rane Pune Municipal Corporations blow to Nilesh Rane Action in case of tax evasion)

पुण्यामधील डेक्कन भागात असलेल्या आर डेक्कन व्यवसायिक जागेचा कर न भरल्याने माजी खासदार नीलेश राणे यांच्या जागा पालिकेकडून सील करण्यात आली आहे. महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने मालमत्ता थकबाकी प्रकरणी ही मोठी कारवाई केली आहे. त्यांच्यावर 3 कोटी 77 लाख 53 हजार रुपयांची थबकी लावण्यात आली आहे. पुणे महापालिकेकडून कर थकीत असलेल्या वेगवेगळ्या शहरात कारवाई केली जात आहे.

- Advertisement -

कारवाईमध्ये काही गैर नाही

माजी खासदार नीलेश राणे यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईनंतर नीलेश राणे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. ते म्हणाले की, महापालिकेचे पैसे थकले असतील म्हणून त्यांनी ही कारवाई केली आहे. त्यात काही गैर नाही. या जागेची थकबाकी भरली नसती तर वेगळे वृत्त समोर आले असते. आता कारवाई झाली आहे आणि आम्ही थकबाकी भरणार असल्याचे नीलेश राणे म्हणाले.

हेही वाचा : Budget Session : सर्वच गरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण द्या; ठाकरे गटाची मागणी

- Advertisement -

काही दिवसाआधीच बजावण्यात आली होती नोटीस

मिळालेल्या माहितीनुसार, माजी खासदार नीलेश राणे यांची पुण्यातील डेक्कन कॉर्नर येथे नीलेश राणे यांचे एक दुकान आहे. तिसऱ्या मजल्यावरील दुकानाची थकबाकी होती. या मॉलची किंमत 5 कोटी 60 लाख रुपये आहे. थकबाकीचा पुणे महापालिकेने वारंवार पाठपुरावा केला जात होता. त्यांना काही दिवसांआधी नोटीस देखील पाठवण्यात आली होती. तरीही त्यांनी थकबाकी भरली नाही. त्यामुळे महापालिकेने थेट राणेंच्या मालमत्तेवर कारवाई केली आहे.

हेही वाचा : Thackeray group : भाजपा हा शेठजींचा पक्ष आणि सावकारी हाच त्यांचा धंदा, ठाकरे गटाची टीका

मार्च एंडमुळे पुणे पालिका Action मोडवर

मार्च एंडमुळे पुणे महापालिका Action मोडवर आली आहे. पुणे महापालिकेकडून मागील काही दिवसांपासून पुण्यात वेगवेगळ्या कारवाया केल्या जात आहे. ज्या ठिकाणी कोट्यावधी कर थकीत आहेत, त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. कारवाई करण्याआधी नोटीस पाठवण्यात येत असून, त्यानंतर कारवाई केली जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -