घरCORONA UPDATEआकडे लपवण्याच्या नादात धारावीत टेस्ट केल्या नाहीत - प्रवीण दरेकर

आकडे लपवण्याच्या नादात धारावीत टेस्ट केल्या नाहीत – प्रवीण दरेकर

Subscribe

आकडे लपवण्याच्या नादात धारावीतील लोकांच्या टेस्टच केल्या जात नाहीत. त्यामुळे नवे रुग्ण सापडण्याचे प्रमाण कमी झाल्याची टीका विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली. तसेच याचा जाब विचारल्यावर लक्षण नसलेल्या लोकांच्या टेस्ट करत नाहीत, या ICMRच्या मार्गदर्शक सूचनेचा दाखल यंत्रणेकडून दिला जातो. त्यामुळे आता आम्ही थेट ICMR शी बोलणार असल्याचेही प्रवीण दरेकर यांनी सांगितले. राज्यातील कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या धारावीत रुग्णांच्या संख्येत गेल्या काही दिवसांपासून लक्षणीय घट झाल्याचे समोर आले होते. तसेच गेल्या नऊ दिवसांत धारावीतील एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. त्यामुळे धारावीत कोरोना नियंत्रणात आल्याची चर्चा सुरु झाली आहे. मात्र, भाजपचे विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी हे सर्व दावे फेटाळून लावले आहेत. मोदी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त प्रवीण दरेकर यांनी रविवारी औरंगाबादेत पत्रकारपरिषद घेतली त्यावेळी ते बोलत होते.

दरम्यान कोरोनाच्या काळात राज्य सरकारने कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना महात्मा फुले जनारोग्य योजनेतंर्गंत समाविष्ट करण्यात येईल असा निर्णय घेतला होता .मात्र,प्रत्यक्षात तसे घडले नसून सर्व सामान्य गोरगरीब जनतेला लाखोंची अवाजवी बिल देऊन त्यांची लूट केली जात आहे. सर्वसामान्य जनतेवर अन्याय होत असून, ज्या रुग्णांनी २५ हजार पासून १० लाख ते १५ लाख रक्कमेची बिल भरली आहेत त्यांच्या बिलांची (रिअम्बर्समेंट) परतफेड तातडीने व्हावी अशी स्पष्ट भूमिका विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी यावेळी मांडली. तसेच खाजगी रुग्णालयांमध्येही कोरोनाच्या रुग्णांकडून लूट करून जी बिले वसूल केली आहेत ती बिले राज्य सरकारने परत करावी यासाठी आम्ही टोकाचा आग्रह धरणार असून, प्रसंगी आंदोलन करावे लागले तरीही रस्त्यावर उतरु असे दरेकर यावेळी म्हणालेत. मुंबईमधील बोरिवली येथे सलीम शेख नावाच्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला ९ लाख ६० हजार रुपयांचे बिल तर कांदिवली येथील रुग्णाला पावणे दोन लाखांचे बिल आकारण्यात आले. सामान्य लोक हे बिल भरू शकत नाहीत. ही परिस्थिती केवळ मुंबईत नसून ठाणे, नगर आणि औरंगाबाद येथेही निदर्शनास आली आले. हा सर्वसामान्यांवर केलेला अन्याय आहे. तरी, यापुढे जे खासगी रुग्णालयात जातील त्यांना तात्काळ जेथे ॲडमिट आहेत तेथे जन आरोग्य योजनेअंतर्गत उपचार करण्यात यावेत किंवा स्पेशल इंडिव्हिज्युअल केस म्हणून जन आरोग्य मध्ये सामावून घ्यावे, अशी मागणी सरकारकडे करणार असल्याचे ते म्हणालेत.

- Advertisement -

संजय राऊत यांच्यावरही टीका –

अभिनेता सोनू याच्यावर संजय राऊत यांनी केलेल्या टिकेवर देखील दरेकर यांनी हल्ला चढवत सामना वृत्तपत्रामधून विरोधी पक्षावर वारंवार टीका होते. संजय राऊत हे चर्चेत राहण्यासाठी काय बोलतील आणि काय अग्रलेख लिहितील याचा नेम नाही. ते कधी राज्यपालांवर टीका करतात नंतर तेच जाऊन  राज्यपाल चांगले व्यक्तिमत्व आहेत सांगून  त्यांचे कौतुक करतात व त्यांना नमस्कारही करतात. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करून त्यांचीही प्रशंसा करतात, त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे फार लक्ष देऊ नये.हा प्रकार केवळ लक्ष विचलित करण्यासाठी होत असल्याचेही त्यांनी सांगितले.


हे ही वाचा – चिअर्स! दारू स्वस्त होणार, सरकाराने घेतला नवीन निर्णय!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -