घरमुंबईआता एफडीए अधिकाऱ्यांना मिळणार सुरक्षा

आता एफडीए अधिकाऱ्यांना मिळणार सुरक्षा

Subscribe

प्रत्येक राज्यातील अन्न आणि औषध प्रशासनातील अधिकाऱ्यांना पोलीस सुरक्षा देण्याची सुचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ड्रग कन्सलटेटिव्ह कमिटी (DCC) ने केली आहे.

पंजाबमधील औषधविक्रेत्याच्या झालेल्या हत्येचा मुद्दा ताजा असताना औषध विक्रेत्यांना सुरक्षा दिली जावी, अशी मागणी करण्यात आली होती. याप्रकरणाची आता गंभीर दखल घेतली गेली असून लवकरच एफडीए अधिकाऱ्यांना सुरक्षा मिळणार आहे. प्रत्येक राज्यातील अन्न आणि औषध प्रशासनातील अधिकाऱ्यांना पोलीस सुरक्षा देण्याची सुचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ड्रग कन्सलटेटिव्ह कमिटी (DCC) ने केली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ड्रग कन्सलटेटिव्ह कमिटी (DCC) च्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

मसुदा तयार

पंजाबमधील औषध नियंत्रक अधिकाऱ्याच्या हत्येचा मुद्दा ड्रग कन्सलटेटिव्ह कमिटीच्या बैठकीत मांडण्यात आला होता. ड्रग कन्सलटेटिव्ह कमिटीच्या म्हणण्यानुसार, औषध नियंत्रक अधिकाऱ्यांना धमकी देणं, हत्या अशा घटना घडत आहेत. अधिकाऱ्यांच्या सुरक्षेबाबतचा मुद्दा वारंवार समोर येत आहे. त्यामुळे प्रत्येक राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागात पोलीस सुरक्षा द्यावी, अशा सूचना ड्रग कन्सलटेटिव्ह कमिटीने केल्या असून त्याबाबतचा मसुदा तयार करण्यात आला आहे.

ड्रग कन्सलटेटिव्ह कमिटीने मसुद्यातील मुद्दे

  • प्रत्येक राज्याने आपल्या राज्यातील औषध नियंत्रकांना सुरक्षा द्यावी.
  • औषध नियंत्रकांच्या सुरक्षेसाठी औषध नियंत्रक विभागात पोलिसांची नियुक्ती करावी.
  • औषध नियंत्रक विभागाने आपल्या राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनाकडे प्रत्येक जिल्ह्यात औषध नियंत्रक अधिकाऱ्यांच्या सुरक्षेसाठी किमान एक पोलीस अधिकारी देण्याची मागणी करावी.
  • मार्च, २०१९मध्ये पंजाबमध्ये औषध नियंत्रक अधिकारी नेहा शौरींची हत्या झाली होती. एका औषध विक्रेत्याचा परवाना रद्द केल्याने नेहा यांची हत्या करण्यात आली होती. यानंतर देशभरातील सर्व औषध नियंत्रकांचा सुरक्षेचा मुद्दा उपस्थित झाला होता. पण, आता केंद्राने दिलेल्या सुचनेमुळे औषध नियंत्रकांमध्ये सध्या आनंदाचे वातावरण आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -