घरमुंबईघाटकोपर ब्रिज वाहतूकीसाठी पुन्हा सुरु

घाटकोपर ब्रिज वाहतूकीसाठी पुन्हा सुरु

Subscribe

मुंबईमधील आणखी एक ब्रिजाला तडे गेले आहे. घाटकोपरमधील पूर्व-पश्चिम भागाला जोडणारा ब्रिज वाहतूकिसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे या भागामध्ये मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.

घाटकोपरचा पूर्व-पश्चिम भागाला जोडणारा ब्रिज वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. स्ट्रक्चर ऑडीटनंतर महापालिका प्रशासनाकडून ब्रिजवरील वाहतूक पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शनिवारी रात्रीपासून हा ब्रिज वाहतूकिसाठी बंद करण्यात आला होता. दरम्यान खासदार किरीट सोमय्या, नगरसेविका राखी जाधव, वाहतूक विभाग, पालिका पूल विभागाचे अधिकारी आणि रेल्वे अधिकाऱ्यांनी घाटकोपर पुलाची पाहणी केली होती.

- Advertisement -

घाटकोपर पूर्व-पश्चिम भागाला जोडणारा ब्रिज वाहतुकिसाठी बंद करण्यात आला होता. काल रात्री या ब्रिजला तडे गेल्याने आणि ब्रिज खालच्या बाजूने झुलकल्याचे समोर आले होते. त्यामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव ब्रिजवरील वाहतूक बंद करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. मात्र आता या ब्रिजचे स्ट्रक्चर ऑडीट करण्यात आले. त्यानंतर हा ब्रिज वाहतूकिसाठी खुला करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

वाहतूक बंद करण्यात आल्यामुळे या भागामध्ये मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. या ब्रिजवरुन अंधेरीला जाणाऱ्या गाड्यांची रहदारी असते. हा ब्रिज इस्टर्न एक्स्प्रेस हायवेला देखील जोडणारा आहे. ब्रिज बंद करण्यात आल्याने या रस्त्यावरुन अंधेरीकडे आणि इस्टर्न एक्सप्रेस हायवेकडे जाणाऱ्या प्रवाशांना फटका बसला होता. मात्र आता ब्रिज पुन्हा सुरु केल्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -