घरमुंबईअकरावी ऑनलाईन अ‍ॅडमिशन : ‘या’ तारखेपासून करता येणार ऑनलाईन सराव

अकरावी ऑनलाईन अ‍ॅडमिशन : ‘या’ तारखेपासून करता येणार ऑनलाईन सराव

Subscribe

विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अर्ज भरण्याची प्रक्रिया २६ जुलैपासून सुरू होणार आहे. त्यामुळे ऑनलाईन अर्ज भरण्याचा सराव विद्यार्थ्यांना २४ जुलैपर्यंत करता येणार आहे. ऑनलाईन सराव अर्जाची सुविधा प्रथमच उपलब्ध करून देण्यात आली आहे.

अकरावीचा प्रवेश अर्ज भरताना विद्यार्थ्यांकडून चुका होऊ नयेत यासाठी शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना १६ जुलैपासून ऑनलाईन सराव अर्ज उपलब्ध केला आहे. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अर्ज भरण्याची प्रक्रिया २६ जुलैपासून सुरू होणार आहे. त्यामुळे ऑनलाईन अर्ज भरण्याचा सराव विद्यार्थ्यांना २४ जुलैपर्यंत करता येणार आहे. ऑनलाईन सराव अर्जाची सुविधा प्रथमच उपलब्ध करून देण्यात आली आहे.

11th admission

- Advertisement -

11th admission

 

- Advertisement -

मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती व नागपूर या महापालिका क्षेत्रात ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येते. शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. सध्या कॉलेजांची जागा नोंदणी सुरू असून, २६ जुलैपासून विद्यार्थ्यांना ऑनलाईन नोंदणी व प्रवेश अर्ज भाग १ भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. दरवर्षी अर्ज भरताना विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात चुका होत असतात. या चुका टाळण्यासाठी यावर्षी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून विद्यार्थ्यांना ऑनलाईन सराव अर्ज उपलब्ध करून देण्यात येणारआहे. अकरावीच्या https://mumbai.11thadmission.org.in या संकेतस्थळावर Mock.Demo.Registration या नावाने लिंक देण्यात येणार आहे. या लिंकवरून विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याचा सराव करता येणार आहे.

दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना अर्ज भरताना अडचणीना सामोरे जावे लागू नये, त्यांना अर्ज भरण्याचा सराव करता यावा, मूळ अर्ज भरताना चुका होवू नयेत, यासाठी आठ दिवसाच्या कालावधीत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांसाठी प्रारूप लॉगीन सुविधा दिली आहे. या सुविधेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्याचा सराव करावा. प्रत्यक्षात अर्ज भरण्यास सुरुवात होणेपूर्वी सराव अर्जात भरलेली माहिती नष्ट करण्यात येणार आहे. २६ जुलैपासून मूळ संकेतस्थळावर नव्याने अर्ज भरण्याची सुविधा २६ उपलब्ध करण्यात येणार आहे. तसेच प्रत्यक्ष अर्ज भरताना नव्याने नोंदणी करावी लागणार आहे, याची नोंद विद्यार्थी, पालकांनी घ्यावी अशी माहिती विभागीय शिक्षण उपसंचालक राजेंद्र अहिरे यांनी निवेदनाद्वारे दिली आहे.

शाळास्तरावर ऑनलाईन अर्ज होणार प्रमाणित

मुंबई महानगरक्षेत्रातील सर्व मंडळाच्या माध्यमिक शाळांनी विद्यार्थ्यांच्या प्रवेश अर्जातील भाग-१ मधील माहिती ऑनलाईन कागदपत्रांची पडताळणी करून प्रमाणित करावे. विद्यार्थी किंवा पालकांना योग्य ते मार्गदर्शन करावे लागणार आहे. विद्यार्थ्यांच्या प्रवेश अर्जातील भाग १ मधील माहिती प्रमाणित करण्यासाठी शाळांनी गतवर्षीचेच लॉगीन आयडी व पासवर्ड वापरावेत. शाळास्तरावरून अर्ज प्रमाणित करण्याची कार्यवाहीसुद्धा ऑनलाईनच करावयाची आहे.

ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचे टप्पे – 

१. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी करणे, प्रवेश अर्ज भाग- १ भरणे व प्रवेश अर्जातील माहिती प्रमाणित करणेसाठी शाळा / मार्गदर्शन केंद्र निवडणे आणि आपला प्रवेश अर्ज व्हेरीफाईड झाला आहे याची खात्री करणे.

प्रक्रिया सुरू होण्याची तारी : २६ जुलै २०२० पासून

२. विद्यार्थी  प्रवेश अर्जातील माहिती, भाग – १ ऑनलाईन तपासून व्हेरीफाय करणे. आवश्यकता असल्यास विद्यार्थ्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला जाणार आहे.

प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : २७ जुलै २०२० पासून

३. विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा भाग – २ (प्रवेशासाठी पसंतीक्रम) नोंदविणे व सबमिट / लॉक करणे त्याचबरोबर नवीन अर्ज भाग १  सुद्धा भरता येणार आहे.

ही प्रक्रिया दहावी राज्य मंडळाचा निकाल जाहीर झाल्यानंतर जाहीर केले जाणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -