घरमुंबईशिक्षक व शिक्षकेतरांचे वेतननिश्चिती करण्याचे आदेश

शिक्षक व शिक्षकेतरांचे वेतननिश्चिती करण्याचे आदेश

Subscribe

मुंबई, ठाणे, रायगड, पालघरसह संपूर्ण राज्यातील शिक्षक व शिक्षकेतरांची वेतन निश्चिती करण्यासाठी लेखाधिकाऱ्यांनी कॅम्प आयोजित करावे अशी मागणी

मुंबई, ठाणे, रायगड व पालघर जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची सातव्या वेतन आयोगाची वेतन निश्चिती करण्यासाठीचे कॅम्प तातडीने सुरू करावेत असे आदेश काल मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालकांनी लेखाधिकाऱ्यांना दिले. याबाबत भाजपा प्रदेश शिक्षक आघाडीचे मुंबई व कोकण विभाग अध्यक्ष अनिल बोरनारे, ठाणे विभागाचे संयोजक विकास पाटील सहसंयोजक शब्बीर शेख यांनी २४ फेब्रुवारी रोजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेतली होती व मुंबई, ठाणे, रायगड, पालघरसह संपूर्ण राज्यातील शिक्षक व शिक्षकेतरांची वेतन निश्चिती करण्यासाठी लेखाधिकाऱ्यांनी कॅम्प आयोजित करावे अशी मागणी देखील केली. शिक्षणमंत्र्यांनी याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

वेतन निश्चिती शिबिर आयोजित करा

मुंबई, ठाणे, पालघर व रायगड जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतरांसाठी कॅम्प आयोजित करण्याबाबत क शिक्षण उपसंचालकांची भाजपा प्रदेश शिक्षक आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन मुंबई विभागातील शिक्षण उपसंचालकांशी चर्चा केली. त्यानुसार मंगळवारी शिक्षण उपसंचालकांनी मुंबई, ठाणे, पालघर व रायगड जिल्ह्यातील लेखाधिकाऱ्यांना आदेश देऊन शिक्षक व शिक्षकेतरांची १ जानेवारी २०१६ पासूनची ७ व्या वेतन आयोगप्रमाणे वेतन निश्चिती करण्याच्या संबंधी शिबिर तात्काळ आयोजित करण्याचे सांगितले व त्याची कॉपी भाजपा प्रदेश शिक्षक आघाडीच्या सुपूर्द केली.

- Advertisement -

त्यानुसार, शिक्षण उपसंचालकांनी काढलेल्या आदेशामुळे मुंबई विभागातील सर्व लेखाधिकाऱ्यांना तातडीने वेतन निश्चिती करण्याचे शिबीरं आयोजित करावी लागणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -