घरमुंबईवाडिया रुग्णालय बंद करण्याचा महापालिकेचा घाट

वाडिया रुग्णालय बंद करण्याचा महापालिकेचा घाट

Subscribe

स्थायी समितीच्या बैठकीत विरोध पक्षनेते रवी राजा यांनी महापालिकेवर आरोप केला आहे.

परेल मधील वाडिया रुग्णालयाला मागील तीन वर्षांपासून महापालिकेने अनुदान न दिल्यामुळे हे रुग्णालय बंद करण्याचा घाट व्यवस्थापनाने घातल्याचा आरोप विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी स्थायी समितीच्या बैठकीत केला. त्यामुळे महापालिकेने हे रुग्णालय ताब्यात घ्यायचे तेव्हा घ्यावे. परंतु तोपर्यंत किमान तीन महिन्यांचे अनुदान दिले जावे, अशी मागणी स्थायी समिती सदस्यांनी केली आहे.

तीन वर्षांपासून ९६ कोटी रुपयांचे अनुदान थकीत

मुंबई महापालिका प्रशासन परेलमधील वाडिया रुग्णालय बंद करण्याचा घाट घालत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी हरकतीच्यामुद्दयाद्वारे स्थायी समितीत केला. जाणूनबुजून महापालिका प्रशासन हे वाडिया रुग्णालय बंद करत असल्याचे त्यांनी सांगितले. मागील तीन वर्षांपासून ९६ कोटी रुपयांचे अनुदान थकीत आहे. या अनुदानाची रक्कमही सरकारने दिली नसल्याचा आरोप करत हे रुग्णालय सुरू राहणे आवश्यक असल्याचे सांगितले. याला भाजपच्या राजेश्री शिरवाडकर यांनी पाठिंबा देताना महापालिकेकडून ९६ कोटी रुपये तर सरकारकडून १०० कोटी रुपये येणे बाकी असल्याचे सांगितले. तब्बल १५० व्हेंटीलेटर्स असलेले हे प्रशस्त असलेले मोठे बालरुग्णालय आहे. परंतु प्रशासनाच्या आडमुठे धोरणामुळे हे रुग्णालय बंद होण्याच्या वाटेवर असल्याची भीती शिरवाडकर यांनी व्यक्त केली.

- Advertisement -

नक्की वाचा – दुर्मिळ हृदयदोषाच्या केनियाच्या रुग्णावर मुंबईत यशस्वी उपचार

आजही वाडिया रुग्णालयात महापालिकेला काही स्थान नाही

समाजवादी पक्षाचे रईस शेख यांनी ८०० खाटांचे हे रुग्णालय असल्याचे सांगून हे रुग्णालय महापालिकेला देणगी स्वरुपात मिळालेले आहे. परंतु आजही वाडिया रुग्णालयात महापालिकेला काही स्थान नाही. महापालिकेने अनुदान द्यायचे पण महापालिकेचे ऐकायचे नाही, हे योग्य नसून याची संपूर्ण नस्तीच स्थायी समिती समोर ठेवली जावी, अशी मागणी केली. हे रुग्णालय महापालिकेचे असून ते महापालिकेलाच मिळावे, अशी मागणी करत शिरवाडकर यांच्या मागणीनुसार तीन महिन्यांची रक्कम रुग्णालयाला देऊन पुढील निर्णय त्यावर घेतला जावा, अशी सूचना केली. शिवसेनेच्या राजुल पटेल यांनीही यावर मत व्यक्त करत हे रुग्णालय महापालिकेने ताब्यात घ्यावे अशीच सुचना केली. ही संस्था लहान मुलांच्या नावे देणगी गोळा करत असते. त्यामुळे महापालिकेने अटी व शर्तींचे पालन केल्याशिवाय रुग्णालय व्यवस्थापनाला पैसेच देऊ नये, अशी भूमिका मांडली तर सभागृहनेत्या विशाखा राऊत यांनी तीन महिन्यांकरता रुग्णालयाला पैसे दिले जावे, अशी सूचना केली.

- Advertisement -

या रुग्णालयात पैसे देण्याची नेमकी गरज आहे का?

राष्ट्रवादीच्या गटनेत्या राखी जाधव यांनी हे रुग्णालय बंद होणे योग्य ठरणारे नसून नक्की पैसे देण्याबाबत कोणती अडचण येत आहे, यासाठी अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली सर्व सदस्यांनी आयुक्तांची भेट घेवून त्यावर निर्णय घ्यावा, अशी सूचना केली. यावर स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सर्व सदस्यांनी मांडलेली मते तपासून पुढील बैठकीत लेखी उत्तरे दिली जावी, असे आदेश दिले. तसेच या रुग्णालयात पैसे देण्याची नेमकी गरज आहे का? हेही तपासून पाहावे.


हेही वाचा – बीएमसीच्या मुख्यालयासमोरील सौंदर्यीकरणाच्या प्रकल्पामुळे रस्ता सुरक्षितताच धोक्यात


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -