घरमुंबईशेतकरी आंदोलनात भेंडीबाजारातील लोकं - प्रविण दरेकर

शेतकरी आंदोलनात भेंडीबाजारातील लोकं – प्रविण दरेकर

Subscribe

शेतकरी आंदोलनाआड मोदींवर टीका

शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातही शेतकरी आंदोलन करण्यात येत आहे. शेतकरी आंदोलन मुंबईत येऊन धडकले आहे. मुंबईच्या आझाद मैदानावर राज्यातील शेतकरी एकवटले आहेत. परंतु शेतकरी आंदोलनात भेंडीबाजारातील लोक घुसवले असल्याचे आरोप विधानसभा विरोध पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी केले आहे. तसेच शिवसेनेने या कृषी कायद्याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी असेही प्रविण दरेकर यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रातील शेतकरी आंदोलनावर भाजपतर्फे प्रतिक्रिया देण्यात आली आहे. प्रविण दरेकर यांनी म्हटले आहे की, केंद्र सरकारने आणलेले शेतकरी कायदे हे सर्व शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी आहेत. हा कायदा शेतकऱ्यांच्या हिताचे असल्याचे भाजपाचे आजही म्हणने असल्याचे त्यांनी सांगितले आहे. आज होणाऱ्या आंदोलनांमध्ये हेच सांगितले जात आहे की, हा कायदा शेतकऱ्यांचा कसा फायद्याचा नाही. परंतु हा कायदा कसा फायदेशीर आहे ही चर्चा कुठेही होत नाही आहे.

केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदींवर टीका करण्याचे काम या शेतकरी आंदोलनामधून शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून करण्यात येत आहे. कारण आता मोदी सरकारव टीका करण्यासाठी कोणतेही कारण नाही. कोरोना असो अर्थव्यवस्था सावरण्यासाठी ज्या प्रकारे मोदी सरकार पाऊले उचलत आहेत. त्यामुळे आपले राजकीय भविष्य काय आहे. याचा विचार करुन मोदी सरकारव टीका करत आहेत.

- Advertisement -

शेतकरी कायदा हा काँग्रेसच्या काळापासून सुरु आहे. परंतु शेतकऱ्यांचा आधार घेत आपले राजकारण काही नेते करत आहेत. असा घणाघाती आरोप प्रविण दरेकर यांनी केला आहे. दरेकर यांनी सांगितले की, मी आझाद मैदानावर गेलो होतो. तिथे गेल्यावर काही मुस्लिम मंडळी आपल्या हातात शेतकरी मोर्चाचा झेंडा घेऊन येत होते. त्या मुस्लिम महिला आणि मंडळींना “शेतकरी तुम्ही कुठुन आले” असे विचारले असता त्यांनी भेंडी बाजारातून आले असल्याचे सांगितले.

शेतकरी आंदोलनात काही शेतकरी नाशिकचे आहेतही परंतु काही लोक ही मोठ्या संख्येने आणले गेले असल्याचे प्रविण दरेकर यांनी म्हटले आहे. असे काही लोकं आहेत ज्यांचे शेतीशी काही संबंध नाहीत. पाहिजे असेल तर तूम्ही तपासून घ्या असेही विधानसभा विरोध पक्षनेते प्रविण दरेकर यांनी म्हटले आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -