घरमुंबईई-फार्मसीविरोधात फार्मासिस्टचे आंदोलन

ई-फार्मसीविरोधात फार्मासिस्टचे आंदोलन

Subscribe

राज्यातील फार्मासिस्ट काळ्या फिती लावून सरकारचा निषेध नोंदवत आहेत. या आंदोलनाला शुक्रवारपासून सुरूवात झाली असून २७ तारखेपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार आहे.

एकीकडे केंद्र सरकार देशात ई-फार्मसीला हिरवा कंदिल दाखवण्याच्या तयारीत आहे. त्याचा ठोस मसूदाही केंद्राने तयार केला आणि त्याबाबत सूचना आणि हरकती मागवल्या. मात्र दुसरीकडे, केमिस्ट आणि फार्मासिस्टने केंद्राच्या निर्णयाविरोधात एल्गार पुकारला आहे. याच जाहिर मसुद्याविरोधात २८ सप्टेंबरपासून देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे. तोपर्यंत, २१ ते २७ सप्टेंबर या काळात राज्यातील फार्मासिस्ट काळ्या फिती लावून सरकारचा निषेध नोंदवत आहेत. या आंदोलनाला शुक्रवारपासून सुरूवात झाली आहे.

केमिस्ट संघटनांचा निषेध मोर्चा

या निषेध आंदोलनानंतर देशभरातील केमिस्ट आणि फार्मासिस्ट संपावर जाणार आहेत. १७ जुलै २०१८ ला ही राज्यातील केमिस्ट संघटनांनी मुंबईतील फुड अँड ड्रग्ज असोसिएशन (एफडीए) कार्यालयावर निषेध मोर्चा काढला होता. पण, आता या फार्मासिस्ट आणि केमिस्ट संघटनांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

केंद्र सरकारने ई-फार्मसी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे, झोपेची औषधं, गर्भपाताच्या गोळ्या यांसारखी धोकादायक औषधं सहज उपलब्ध होतील. याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होऊ शकतो. याच्याच निषेधार्थ फार्मासिस्ट आणि केमिस्ट संघटनांनी २८ सप्टेंबरला संपावर जायचा निर्णय घेतला आहे. त्या आधी २१ ते २७ सप्टेंबर पर्यंत काही फार्मासिस्ट काळ्या फिती लावून काम करत आहेत.
– कैलास तांदळे, अध्यक्ष, महाराष्ट्र रजिस्टर्ड फार्मसी असोसिएशन

फार्मासिस्टचा विरोध का?

Prohibition of chemists
काळ्या फिती लावून कर्मचारी कामावर

ऑनलाईन उपलब्ध होणारी औषधांमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. ई-फार्मसीवर कुणाचेच नियंत्रण राहणार नाही. तसंच, औषधांचा दर्जा राखला जाणार नाही. ई-फार्मसीमुळे बेकायदेशीर व्यापार वाढण्याची शक्यता बळावू शकते. तसेच औषध विक्रेते संघटनांनी २०१३ सालापासून आजपर्यंत औषध दुकानात काम करणाऱ्या अशिक्षित व्यक्तींना पाच वर्षे अनुभव असल्यास फर्मासिस्टसचा दर्जा द्या, अशी मागणी २८ सप्टेंबर २०१८ च्या संपात केल्यामुळे आजपासून २७ सप्टेंबर २०१८ पर्यंत मालक फर्मासिस्ट आपल्या शर्टावर काळ्या फिती लावून औषध दुकानात काम करत आहेत, असंही कैलास तांदळे यांनी स्पष्ट केलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -