घरमुंबईविदेशात नोकरीचे आमिष दाखविणार्‍या टोळीचा पर्दाफाश

विदेशात नोकरीचे आमिष दाखविणार्‍या टोळीचा पर्दाफाश

Subscribe

विदेशी नोकरीचे आमिष दाखवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश पोलिसांनी केला आहे. गोरेगाव आणि बंगलोर शहरातून महिलेसह चौघांना पोलिसांनी अटक केले आहे. या टोळीने महाराष्ट्र, पंजाब, तामिळनाडूसह इतर राज्यात फसवणुक केल्याचे उघड झाले आहे.

विदेशात नोकरीचे आमिष दाखवून गरजू बेरोजगार तरुण-तरुणींकडून लाखो रुपये उकाळून त्यांची फसवणुक करणार्‍या एका टोळीचा गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी गोरेगाव आणि बंगलोर शहरातून एका महिलेसह चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. अजय भवानीशंकर गुप्ता, सॅडरिक डॉकनिक रॉबर्ट, विग्नेश सुरेश के. सी आणि स्नेहा नरेंद्र पंचारिया अशी या चौघांची नावे आहेत. ते चौघेही कर्नाटक येथील बंगलोर शहरातील रहिवाशी असल्याचे पोलिसांनी सांगितले. या टोळीने आतापर्यंत महाराष्ट्रासह पंजाब, तामिळनाडू आणि इतर राज्यातील अनेकांना नोकरीचे आमिष दाखवून गंडा घातल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. यातील तक्रारदार हे वयोवृद्ध असून ते कांदिवली परिसरात राहतात. त्यांनी आखाती देशात काही वर्ष नोकरी केली असून सध्या ते सेवानिवृत्त झाले आहे. मात्र आर्थिक अडचणीमुळे ते पुन्हा नोकरीच्या शोधात होते.

काय आहे प्रकरण ?

ऑगस्ट महिन्यांत त्यांना फेसबुकवर इंटरनॅशनल जॉब्स अ‍ॅण्ड फ्रि रिक्रुटमेंट ही जाहिरात वाचण्यात आली होती. या जाहिरातीमध्ये कॅनडा, युएसए आणि युएई येथे भरघोस पगाराच्या विविध तांत्रिक पदाच्या जागा रिक्त असल्याचे नमूद करण्यात आले होते. त्यामुळे त्यांनी जाहिरातीत दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला होता. तसेच नोकरीसाठी त्यांना त्यांची सविस्तर माहिती दिली होती. ही माहिती मिळताच त्यांना आरोपींना कॅनडा येथे नोकरीचे आमिष दाखविले होते. एका आरोपीने आपण कॅनडा येथील उच्चपदस्थ अधिकारी असल्याची बतावणी करुन त्याच्या विदेशी सीमकार्डवरुन एक वॉट्सअप गृप तयार केला होता. त्यांचा विश्वास बसावा म्हणून त्याने या गृपमध्ये अनेकांचे फोटो, व्हिसा आणि त्यांनी मिळालेल्या नोकरीचा बोगस तपशील दिला होता. त्यावर विश्वास ठेवून तक्रारदाराने त्यांना कामासाठी सुमारे दिड लाख रुपये पाठविले होते, ही रक्कम त्यांनी दिलेल्या बँक खात्यात जमा करण्यात आली होती. मात्र दिलेल्या मुदतीत त्यांनी त्यांना कॅनडा येथे नोकरी मिळवून दिली नाही. नोकरी मिळत नसल्याने त्यांनी त्यांच्या पैशांची मागणी सुरु केली होती, मात्र या आरोपींनी त्यांना प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर त्यांनी कांदिवली पोलिसांत अज्ञात आरोपींविरुद्ध फसवणुकीची तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून आरोपींचा शोध सुरु केला होता. या गुन्ह्यांचा संमातर तपास गुन्हे शाखेचे अधिकारीही करीत होते.

- Advertisement -

पोलिसांनी चारही आरोपीला अटक केले

तपासादरम्यान तांत्रिक माहितीवरुन गोरेगाव परिसरातून अजय गुप्ता या तरुणाला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्याकडून पोलिसांनी जाहिरातीसंबंधी काही दस्तावेज आणि मोबाईल जप्त केले होते. चौकशीत त्याने तो इतर आरोपींच्या मदतीने बोगस जॉब रॅकेट चालवित असल्याची कबुली दिली. त्याच्या जबानीतून आलेल्या माहितीनंतर या पथकाने बंगलोर येथून सॅडरिक, विग्नेश आणि स्नेहा या तिघांना अटक केली. त्यांच्याकडून गुन्ह्यांतील लॅपटॉप, मोबाईल फोन आणि इतर दस्तावेज पोलिसांनी जप्त केले आहे. सध्या चारही आरोपी पोलीस कोठडीत असून त्यांची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे.

हे आहेत आरोपी 

 

- Advertisement -

हेही वाचा – मुंबई विद्यापीठात पासिंग रॅकेटचा पर्दाफाश; उत्तरपत्रिकांमध्ये फेरफार!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -