घरमुंबईविश्वासू मोलकरणीने दिला धोका; दागिन्यांची केली चोरी

विश्वासू मोलकरणीने दिला धोका; दागिन्यांची केली चोरी

Subscribe

डोंबिवलीमध्ये एका विश्वासू मोलकरणीने घरातील दागिन्यांची चोरी केली. कल्याण गुन्हे अन्वेष विभागाने या मोलकरणीचा पर्दाफाश केला आहे.

डोंबिवलीमध्ये एका विश्वासू मोलकरणीने काबरा कुटुंबियांना धोका दिला आहे. काबरा पती-पत्नी घरी नसताना तिने कपाटाच्या लॉकरमधील दागिने लंपास केले. कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाने या मोलकरणीचा पर्दाफाश करुन अटक केले. या मोलकरणीला कल्याण न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या मोलकरणीचे नाव उर्मिला जिंतेद्र कदम असे असून ती डोंबिवलीच्या त्रिमूर्ती नगरची रहिवासी आहे.

काय आहे नेमके प्रकरण?

उर्मिला कदम ही महिला काबरा कुटुबियांच्या घरी धुणे-भांड्याचे काम करायची. काबरा पती-पत्नी दोघेही इंजिनिअर असल्यामुळे ते दररोज ऑफिसात जातात. सात ते आठ महिन्यांपूर्वी काबरा यांच्या पत्नीने त्यांचे दागिने बेडरुमधील लाकडी कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवले होते. त्यानंतर त्यांनी त्या दागिन्यांकडे लक्षच दिले नाही. दोन जुलैला जेव्हा त्यांनी लॉकर उघडले तेव्हा त्यांना दागिने आढळली नाहीत. दागिने चोरीची खात्री झाल्यावर त्यांनी डोंबिवली पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. या दागिन्यांची किंमत १ लाख रुपये इतकी आहे. ही तक्रार कल्याण गुन्हे अन्वेष विभागाकडे वर्ग करण्यात आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने तपास सुरु करुन उर्मिलाची चौकशी केली. या चौकशीत तिने अगोदर उडवाउडवीचे उत्तरे दिले. त्यानंतर अखेर तिने आपला गुन्हा मान्य केला. तिने दोन महिन्यांपूर्वी हे दागिने चोरी करुन डोंबिवलीच्या गोग्रासवाडी येथील पूजा ज्वेलर्सला ५० हजार रुपयात विकले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -