घरमुंबईथर्टीफर्स्ट नाईट; पोलीस बंदोबस्त टाईट!

थर्टीफर्स्ट नाईट; पोलीस बंदोबस्त टाईट!

Subscribe

थर्टी फर्स्ट नाईटच्या पार्टीसाठी तमाम मंडळी सज्ज झालेली असतानाच आता पोलीस प्रशासनानेही कंबर कसली आहे. ३१ डिसेंबरच्या रात्रीसाठी विशेष तयारी करण्यात आली आहे.

३१ डिसेंबर अर्थात थर्टीफस्टच्या सेलिब्रेशनसाठी पेालिसांनी कडक पोलीस बंदोबस्त ठेवलाय. कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या परिसरात बंदोबस्तासाठी २ डीसीपी, ३ एसीपी १६ वरिष्ठ पोलीस निरीक्षक, ३२ पोलीस निरीक्षक, ७० सहाय्यक पोलीस निरीक्षक, १५०० पोलीस कर्मचारी, स्ट्रायकिंग फोर्स एसआरपीएफ प्लाटून, आरसीपी मोबाईल आणि राखीव बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याची माहिती पूर्व प्रादेशिक विभाग कल्याणचे अप्पर पोलीस आयुक्त डॉ. प्रताप दिघावकर यांनी दिली आहे. तसेच प्रत्येक पोलीस ठाण्यात स्वतंत्र पथकंही तयार करण्यात आली आहेत.

प्रमुख मार्गांवर नाकाबंदी

थर्टी फस्टच्या रात्री सर्वत्रच वेगवेगळया पद्धतीने सेलिब्रेशनचे नियोजन करण्यात येते. नववर्षाचे स्वागत जल्लोषात करण्यासाठी काही ठराविक ठिकाणी तसेच रस्त्यांवर तरुणाईची गर्दी होत असते. मात्र दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नववर्षाचे स्वागत शांततेत आणि उत्साहात पार पाडण्यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. स्थानिक पोलिसांना अलर्ट राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ३० डिसेंबरला रात्री नऊ ते पहाटे ४ वाजेपर्यंत आणि ३१ डिसेंबरला रात्री आठ पासून पहाटे ४ वाजेपर्यंत सर्व प्रवेश मार्ग आणि बाहेर जाण्याच्या मार्गावर वाहतूक शाखेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह नाकाबंदी करण्यात आली आहे. एकूण १८ ठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार असून ब्रेथ अॅनलायझरने तपासणी करून ड्रंक अॅण्ड ड्राईव्हच्या केसेस करण्यात येणार आहेत. तसेच अवैध गावठी दारू विक्रेते, वाहतूक करणारे, हातभट्टया लावणारे, अंमलीपदार्थ विक्री करणारे यांचा शोध घेण्यासाठी १ अधिकारी आणि ५ कर्मचारी अशी पथके तयार करण्यात आली आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – सेलिब्रेशनच्या नावाखाली मद्यपान करताय…तर सावधान!

गस्तीसाठी विशेष पथके

आर्केस्ट्रा बार, लेडिज सर्व्हिस बार, हॉटेल लॉज, धाबे तपासणीसाठी तसेच महिला, मुलींच्या छेडछाडीसाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात स्वतंत्र पथक तयार करण्यात आले आहे. पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वाखाली अॅन्टी रॉबरी सेल तसेच सहाययक आयुक्तांच्या नेतृत्वाखाली अॅन्टी मोबाईल स्क्वॉडही नेमण्यात आले आहे. प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गर्दीची ठिकाणे, मॉल, सिनेमागृह येथे सशस्त्र गस्ती पथक तैनात असणार आहे. नववर्ष स्वागताच्या दिवशी गुन्हे दाखल असलेले गुन्हेगार आणि रेकॉर्डवरील गुंड यांच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाईला पोलिसांनी सुरुवात केली आहे. ध्वनी प्रदूषणाचे उल्लंघन करणाऱ्या विनापरवाना कार्यक्रमांचं आयोजन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे. तसेच नववर्षासाठी परमिट रूम, शाकाहारी हॉटेल, रेस्टॉरंट, ऑर्केस्ट्रा बार पहाटे पाच वाजेपर्यंत उघडे ठेवण्याला काही अटींवर मान्यता देण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -