Tuesday, February 23, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी pooja chavan आत्महत्या प्रकरणाचे गूढ वाढले, घटनेच्या वेळी पूजाबरोबर अन्य दोघं जण

pooja chavan आत्महत्या प्रकरणाचे गूढ वाढले, घटनेच्या वेळी पूजाबरोबर अन्य दोघं जण

Related Story

- Advertisement -

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण वनमंत्री संजय राठोड यांच्याशी संबंधित असल्याचे समोर आल्यानंतर महाराष्ट्रातले राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. याचदरम्यान, पूजाने ज्यावेळी आत्महत्या केली त्यावेळी तिच्याबरोबर अन्य दोन व्यक्तीही होत्या अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे. यामुळे पूजाच्या हत्येचे गूढ अधिकच वाढले असून त्या दोघांनीच त्या ऑडिओ क्लिप्स स्थानिकांना दिल्याचे समोर आले आहे.

ज्या दिवशी पूजाने आत्महत्या केली त्यावेळी हे दोन तरुण तिच्यासोबत होते. संबंधित मंत्र्यानेच त्यांना पूजाकडे पाठवले होते. पण पूजाने आत्महत्या केल्यानंतर हे दोघे पळण्याच्या तयारीत असताना शेजाऱ्यांनी त्यांना पकडले व त्यांना जाब विचारला. त्यावेळी त्यांनी मंत्र्यानेच आपल्याला येथे पाठवल्याचे सांगितले. तसेच खात्री पटावी म्हणून अरुण राठोड याने त्या ऑडिओ क्लिप्स शेजाऱ्यांना दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

दरम्यान, याप्रकरणाची दखल राष्ट्रीय महिला आयोगानेही घेतली असून पुणे पोलिसांना चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या प्रकरणाची सखोल चौकशी केले जाईल असे सांगितले जाईल. तसेच संबंधितांवर कारवाई केले जाईल असेही ते म्हणाले आहेत. त्याचबरोबर गेले काही दिवस लोकांना आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तो होता कामा नये व सत्य जनतेसमोर येईल असेही त्यांनी म्हटले आहे.

- Advertisement -