घररायगडखालापूरची तहान यंदा भागणार ?

खालापूरची तहान यंदा भागणार ?

Subscribe

सन 2020-21 साठी 70 लाख 95 हजार रुपये निधीची तरतूद

उन्हाळ्याची चाहूल लागताच तालुक्यातील काही गावे आणि वाड्यांना पाणी टंचाईची झळ बसते. पंचायत समिती यंदा भगिरथ प्रयत्न करून तहान भागविण्याचा प्रयत्न करणार आहे. तालुक्यातील टंचाईग्रस्त गावे आणि वाड्यांसाठी पाणी टंचाई निवारण कृती आराखडा गोषवारा तयार करण्यात आला असून, सन 2020-21साठी 70 लाख 95 हजार रुपये निधीची तरतूद तहान भागविणार आहे.

तालुका टंचाईग्रस्त यादीत असून, पावसाळ्याचे चार महिने संपल्यानंतर काही भागात तीव्र पाणी टंचाई जाणवते. यंदाच्या टंचाई निवारण कृती आराखड्यात 27 गावे आणि 39 वाड्यांचा समावेश करण्यात आला आहे. नवीन विंधण विहीर घेणे, टँकरने पाणी पुरवठा करणे, पूरक नवीन पाणी जलवाहिनी घेणे आणि विहीर घेणे इत्यादी उपाययोजना करण्यात येणार आहेत. 35 अंगणवाडी आणि 11 शाळागृहांसाठी विंधण विहिरी एप्रिल 2021 पासून घेण्यात येणार आहेत.त्यासाठी प्रत्येकी 65हजाराची तरतूद करण्यात आली आहे.

- Advertisement -

खालापूर तालुका टंचाई यादीत सातत्याने आहे. 2016-17 वर्षी टंचाईग्रस्त यादीत 30 गावे 40वाड्या होत्या. 2017-18 ला देखील काहीच आकडेवारीत फरक नव्हता. 2018-19 वर्षात 27 गावे आणि 39 वाड्यांतून तीव्र पाणी टंचाई होती. 2019-20 च्या पाणी टंचाई कृती आराखड्यात 27 गावे आणि 39 वाड्यांचा समावेश करण्यात आला होता. यामध्ये 21 गावे आणि 31 वाड्यांतून टँकरने पाणी पुरवठा करण्यात आला होता.

टंचाई निवारण कृती आराखडा- 2020-21
नवीन विंधण विहीर- 9गावे, वाड्या 8
टँकरने पाणी पुरवठा – 21गावे, वाड्या30
पूरक नवीन जलवाहिनी- 1गाव, वाड्या 3
विहीर- 1गाव, वाड्या 2
2020-21साठी निधी तरतूद
सार्वजनिक विहिरी खोल करणे/गाळ काढणे- 6 लाख
टँकर/बैलगाडीने पाणी पुरवठा- 12लाख
नवीन विंधण विहीर- 11.05 लाख
नवीन विंधण विहीर- अंगणवाडी- 22.75लाख
नवीन विंधण विहीर- शाळागृह- 7.15लाख
तात्पुरत्या पूरक पाणी पुरवठा योजना- 12 लाख

- Advertisement -

टंचाईग्रस्त आराखड्यानुसार आवश्यकतेनुसार टँकरची व्यवस्था करण्यात येत आहे. आराखडा मंजुरी झाल्यानंतर नव्याने गावे किंवा वाड्या समाविष्ट करण्यात अडचण होते. त्यासाठी प्रस्ताव करताना अगोदरच तरतूद करण्यात आली आहे.
-संजय भोये, गट विकास अधिकारी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -