घरमुंबईप्रदीप शर्माचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला

प्रदीप शर्माचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला

Subscribe

शर्मा हा निवृत्त पोलीस अधिकारी आहे. तो साक्षीदारांना धमकावू शकतो, अशी शक्यता नाकरता येत नाही. तसेच शर्मा विरोधात हत्येच्या गुन्ह्याचा खटला दाखल होता. त्या खटल्यातून शर्मा निर्दोष सुटला आहे. या सुटकेला राज्य शासनाने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. राज्य शासनाची आव्हान याचिका उच्च न्यायालयाने सुनावणीसाठी दाखल करुन घेतली आहे, असेही न्या. मोहिते ठेरे यांनी जामीन अर्ज फेटाळताना नमूद केले.

मुंबईः  मनसुख हिरेन हत्येप्रकरणी अटकेत असलेला एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्माने दाखल केलेला जामीन अर्ज उच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळून लावला.

न्या. रेवती मोहिते-ढेरे यांच्या खंडपीठाने शर्माचा जामीन अर्ज फेटाळून लावला. सादर झालेल्या कागदपत्रातून मनसुख हिरेनच्या हत्येमध्ये शर्माचा सहभाग असल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट होत आहे. शर्मा हा निवृत्त पोलीस अधिकारी आहे. तो साक्षीदारांना धमकावू शकतो, अशी शक्यता नाकरता येत नाही. तसेच शर्मा विरोधात हत्येच्या गुन्ह्याचा खटला दाखल होता. त्या खटल्यातून शर्मा निर्दोष सुटला आहे. या सुटकेला राज्य शासनाने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. राज्य शासनाची आव्हान याचिका उच्च न्यायालयाने सुनावणीसाठी दाखल करुन घेतली आहे, असेही न्या. मोहिते ठेरे यांनी जामीन अर्ज फेटाळताना नमूद केले.

- Advertisement -

राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या दाव्यानुसार,  या प्रकरणातील इतर आरोपींसह शर्मा यांनी पोलिस आयुक्त कार्यालयाच्या इमारतीच्या आवारात अनेक बैठका घेतल्या. या ठिकाणी कट रचला गेला. बडतर्फ केलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी शर्मा यांना 45 लाख रुपये दिले होते. ही रक्कम त्यांनी हिरेनची हत्या करणाऱ्या व्यक्तीला दिली होती.  शर्मा निर्दोष नाहीत. त्यांनी कट, खून आणि दहशतवादी कृत्य केले आहे. जमा केलेल्या पुराव्यांवरून हे स्पष्ट झाले आहे की प्रदीप शर्मा या गुन्ह्यात सक्रियपणे सहभागी होते. त्यांनी कट रचणे, दहशतवादी कृत्य, दहशतवादी टोळीचे सदस्य, अपहरण, खून आणि पुरावे नष्ट करणे असे गुन्हे केले आहेत. अँटिलियाबाहेर घडलेल्या घटनेची जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिल्यानंतर हिरेनची हत्या करण्यात आली, असा दावा तपास यंत्रणेने केला आहे.

अंबानींच्या निवासस्थानी स्फोटकांनी भरलेली गाडी ठेवण्याच्या टोळीचे प्रदीप शर्मा सक्रिय सदस्य होते. मनसुख हिरेन हा कटातील कमकुवत दुवा होता. त्यामुळे शर्मा यांनी त्याची हत्या केली. मनसुख हिरेनला या संपूर्ण कटाची आणि आरोपींची माहिती होती. तो सत्य उघड करेल या भीतीने त्याची हत्या करण्यात आली, असा दावा एनआयएने केला आहे.

- Advertisement -

याप्रकरणात जामीन मिळावा यासाठी शर्माने न्यायालयात अर्ज केला होता. शर्माचा जामीन अर्ज सोमवारी उच्च न्यायालयाने फेटाळून लावला.

 

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -