Tuesday, June 22, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर मुंबई बोगस पीएचडी डीग्रीप्रकरणी स्वप्ना पाटकरला कोठडी

बोगस पीएचडी डीग्रीप्रकरणी स्वप्ना पाटकरला कोठडी

Related Story

- Advertisement -

बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र बनवल्याप्रकरणी अटक केलेल्या स्वप्ना पाटकर हिला बुधवारी सकाळी वांद्रे न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. बोगस प्रमाणपत्र बनवून पाटकर ही वांद्य्रातील एका नामांकित रुग्णालयात ऑनररी कन्सल्टन्ट म्हणून काम करत होती. अंधेरीतील एका सामाजिक कार्यकर्त्याच्या तक्रारीवरून 26 मे 2021 रोजी स्वप्ना पाटकरविरुद्ध वांद्रे पोलिसांनी बोगस वैद्यकीय दस्तावेज तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल करत पोलिसांनी मंगळवारी पाटकर हिला चौकशीसाठी ठाण्यात बोलावले होते. चौकशीनंतर पोलिसांनी तिला अटक केली. स्वप्ना पाटकरकडे कानपूरमधील छत्रपती शाहूजी महाराज विश्व विद्यालयाचे 2009 मधील क्लिनीकल सायकॉलॉजी या विषयांची पीएचडीचे प्रमाणपत्र आहे.

ही पदवी बोगस असतानाही ती वांद्य्रातील प्रतिष्ठित रुग्णालयात क्लिनिकल सायकोलॉजिस्ट म्हणून काम पाहत होती. मानसिकदृष्ठ्याबाधित आणि निराश असलेल्या लोकांच्या जिवाशी खेळ करून तिने रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांकडून मोठी रक्कम शुल्काद्वारे घेऊन त्यांची फसवणूक केली होती. त्यामुळे पाटकरविरोधात अटकेची कारवाई करण्यात आली होती. अटकेनंतर बुधवारी दुपारी त्यांना वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी कोर्टाने तिला 14 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

- Advertisement -

शिवसेनेच्या एका खासदाराविरुद्ध स्वप्ना पाटकरने यापूर्वी गंभीर आरोप केले होते. या आरोपानंतर राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली होती. स्वप्ना पाटकर ही चित्रपट निर्माता, लेखक आणि अँथ्रप्रिनर म्हणून परिचित आहे. तिने एका मराठी चित्रपटाची निर्मिती केली होती. पाच वर्षांपासून ती एका प्रतिष्ठित रुग्णालयात क्लिनिकल सायकोलॉजिस्ट म्हणून काम करीत आहे. तिच्या दोन स्वतंत्र वेबसाईट असून, तिचे ट्विटरवर सव्वासात हजार फॉलोअर्स आहेत.

- Advertisement -