घरमुंबईरायगडात श्रीराम जन्मोत्सव सोहळा साजरा

रायगडात श्रीराम जन्मोत्सव सोहळा साजरा

Subscribe

रामनवमीचा उत्सव रायगड जिल्ह्यात मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरा झाला. यानिमित्ताने गावोगावच्या श्रीराम मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मंदिरांचा परीसर श्रीरामाच्या जयजयकाराने दुमदुमून गेला होता .

अलिबाग येथील श्रीराम मंदिरात सकाळपासून कीर्तन आयोजित करण्यात आले होते. दुपारी श्रीराम जन्मोत्सव पार पडला. त्यांनतर उपस्थित महिलांनी सामूहिक पाळणागीते सादर केली. मंदिरात श्रीरामांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. भाविकांना प्रसाद म्हणून सुंठवडा वाटण्यात आला. तालुक्यातील रेवस कोळीवाडा, डावली – रांजणखार येथील श्रीराम मंदिरांमध्येही रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सायंकाळी ढोलताशांच्या गजरात पालखी मिरवणुका काढण्यात आल्या. रात्री भजन कीर्तन याबरोबरच मनोरंजनाचे कार्यक्रमदेखील आयोजित करण्यात आले होते.

- Advertisement -

नागोठण्यात श्रीराम जन्मोत्सव सोहळा येथील ब्राह्मण समाजाच्या राम मंदिरात तसेच प्रभूआळीतील पुरातन राम मंदिरात धार्मिक वातावरणात पार पडला. या निमित्ताने दोन्ही मंदिरांत दिवसभरात विविध कार्यक्रम घेण्यात आले. रामनवमीनिमित्त येथील गवळआळीतील साईबाबा मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात येऊन सायंकाळी साईबाबा पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

उरण तालुक्यातील चिरनेर, दिघोडे, चिर्ले, फुंडे, उरण शहरातील श्रीराम मंदिरात व श्री साई मंदिरात रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणात भाविकांनी मंदिर परिसरात दर्शनासाठी गर्दी केली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -