घरताज्या घडामोडीसर्वसामान्यांना प्रवासाची परवानगी देण्याची पूर्वतयारी सुरू? लोकलच्या २,७७३ फेऱ्या वाढवल्या!

सर्वसामान्यांना प्रवासाची परवानगी देण्याची पूर्वतयारी सुरू? लोकलच्या २,७७३ फेऱ्या वाढवल्या!

Subscribe

सर्व सामान्य मुंबईकरांच्या लोकल प्रवासाबाबत राज्य सरकार आणि रेल्वे प्रशासनात एकमत झालेले नाही. तर दुसरीकडे अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, महिलांची संख्या वाढत असल्याने गर्दी होत आहे. परिणामी २ नोव्हेंबरपासून अर्थात सोमवारपासून मध्य रेल्वेवर लोकलच्या अतिरक्त ५५२ तर पश्चिम रेल्वेवर २०१ फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. मात्र, सर्वसामान्य मुंबईकरांना लोकलने प्रवासाची परवानगी देण्यासाठीची पूर्वतयारी म्हणूनच मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून हे पाऊल उचलण्यात आल्याचं बोललं जात आहे. या वाढीव फेऱ्यांमुळे मध्य रेल्वेवर दिवसभरात १ हजार ५७२ तर पश्चिम रेल्वेवर १ हजार २०१ फेऱ्या वाढणार आहेत. यामुळे अत्यावश्यक सेवेाकऱ्यांचा गर्दीच्या वेळचा प्रवास सुकर होणार असून उपनगरीय रेल्वे मार्गावरील एकूण फेर्‍यांची संख्या २ हजार ७७३ झाली आहे.

राज्य सरकारने अत्यावश्यक सेवेतील मुंबईकरांना लोकल प्रवासाची परवानगी दिली आहे. परंतु, लोकलच्या गर्दीवर ठोस उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचे सांगत रेल्वेने सरसकट मुंबईकरांना लोकल प्रवास नाकारला आहे. त्यामुळे मुंबईकरांना लोकलची दारे कधी उघडणार? हा प्रश्न अनुत्तरीत आहे. त्यातच महिलांना सरसकट प्रवासाची मुभा दिल्याने लोकलच्या गर्दीत सुमारे २ लाखांची भर पडली आहे. या वाढत्या गर्दीला सामावून घेण्यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेने लोकलच्या फेऱ्या वाढविण्यावर भर दिला आहे.

- Advertisement -

लोकलची गर्दी वाढतीच!

सध्या पश्चिम रेल्वेवर सध्या दिवसभरात लोकलच्या ७०४ फेऱ्यांमधून सुमारे ४ लाख ५७ हजार तर मध्य रेल्वेवर ७०६ फेऱ्यांमधून ४ लाख ५० हजार प्रवासी प्रवास करीत आहेत. वाढत्या गर्दीमुळे सकाळी आणि संध्याकाळी पीक अवरच्या वेळी लोकलला प्रचंड गर्दी होते. यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाने रविवारी अतिरिक्त ६१० फेऱ्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार रविवारपासून उपनगरी रेल्वे मार्गावर दिवसभरात लोकलच्या २ हजार २० फेऱ्या चालविण्यात आल्या आहे. मात्र, गर्दी काही कमी होण्याचे चिन्ह दिसून येत नसल्यामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वेने पुन्हा सोमवारपासून ७५३ लोकल फेर्‍या वाढविण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -