घरमुंबईसफाई कर्मचार्‍यांना कामावरून काढण्याचा छुपा फतवा!

सफाई कर्मचार्‍यांना कामावरून काढण्याचा छुपा फतवा!

Subscribe

सफाई कर्मचार्‍यांना रेल्वेतील खासगी कंत्राटदारांकडून फसवणूक करण्यात येते. या संबंधीचे वृत्त दैनिक ‘आपलं महानगर’ने प्रकशित केले होते. त्यांनतर खासगी रेल्वे सफाई कर्मचार्‍यांनी अधिकार्‍यांची भेट घेऊन याबद्दल तक्रार केली. मात्र ज्यांनी-ज्यांनी ही तक्रार केली त्यांना नोकरीवरून काढण्याचा छुपा फतवा कंत्राटदाराकडून काढण्यात आला आहे.

रेल्वेच्या खासगीकरणाचे चटके रेल्वे स्थानकांवरील गरीब महिला सफाई कर्मचार्‍यांना बसू लागले आहेत. सफाई कर्मचार्‍यांना रेल्वेतील खासगी कंत्राटदारांकडून फसवणूक करण्यात येते. या संबंधीचे वृत्त दैनिक ‘आपलं महानगर’ने प्रकशित केले होते. त्यांनतर खासगी रेल्वे सफाई कर्मचार्‍यांनी अधिकार्‍यांची भेट घेऊन याबद्दल तक्रार केली. मात्र ज्यांनी-ज्यांनी ही तक्रार केली त्यांना नोकरीवरून काढण्याचा छुपा फतवा कंत्राटदाराकडून काढण्यात आला आहे. त्यामुळे रेल्वे महिला सफाई कर्मचारी हादरून गेल्या आहेत.

मुंबईच्या तिन्ही रेल्वे मार्गावर सफाई कामगारांना ५५० रुपये रोजंदारीप्रमाणे महिन्याला १६ हजार ५०० रुपये मिळणे अपेक्षित होते. मात्र त्यांना ६ ते ७ हजार रुपये दिले जातात. त्यामुळे रेल्वे सफाई कर्मचार्‍यांच्या मासिक वेतनात मोठा घोटाळा होत असल्याचे स्पष्ट होत आहे. या संबंधित रितसर तक्रार केल्यास सफाई कंत्राटदारांकडून कर्मचार्‍यांना दमदाटी देऊन नोकरीवरून काढून टाकण्यात येत आहे. त्यामुळे कंत्राटदारांविरुद्ध खासगी रेल्वे कर्मचारी बोलण्यास नकार देत आहेत. नाव न सांगण्याचा अटीवर काही महिला सफाई कर्मचार्‍यांनी सांगितले की, काही रेल्वे स्थानकांवर चार-पाच कर्मचारी कार्यरत असतानासुद्धा 12 कर्मचार्‍यांच्या वेतनाचे पैसे रेल्वे अधिकारी आणि खासगी कंत्राटदार मिळून हडप करतात. रेल्वे स्थानकांवरील महिला सफाई कामगार अशिक्षित आहेत. त्यांना सफाई ठेकेदार टीडीएस तसेच वेतन पावती देत नाही. पोटासाठी आम्ही तुटपुंज्या वेतनात काम करतो, असे त्या सांगतात.

- Advertisement -

मुंबईतील सर्व रेल्वे स्थानकांवर सफाई करण्यासाठी खासगी कंत्राटदारांना कंत्राट देण्यात येते. मात्र या कंत्राटदारांकडून सफाई कर्मचार्‍यांची पिळवणूक करण्यात येते. चर्चगेट ते विरार दरम्यान प्रत्येक रेल्वे स्थानकांवर तीन शिप्टमध्ये १६ कर्मचारी काम करतात, असे कागदोपत्री रेल्वेला दाखवण्यात येते. पूर्वी एका महिला सफाई कर्मचार्‍याला ३७२ रुपये प्रति दिन वेतन देत होतो. सध्या ही रोजंदारी वाढून प्रतिदिन ५५० रुपये इतकी करण्यात आली, पण त्याचा फायदा सफाई कर्मचार्‍यांना होताना दिसून येत नाही. याबाबत पश्चिम रेल्वेच्या संबंधित अधिकार्‍याकडे विचारणा केली असता त्याने काही बोलण्यास नकार दिला आहे. मात्र आपलं महानगरने या संबंधित बातमी प्रकाशित केल्यानंतर झोपी गेलेल्या रेल्वे अधिकार्‍यांना आता जाग आली. तसेच आता खासगी सफाई कंत्राटदारांवर रेल्वे अधिकार्‍याकडून बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. खासगी सफाई रेल्वे कर्मचार्‍यांनी या संबंधित सखोल चौकशीची करण्याची मागणी केली आहे.

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -