Mumbai Local: पुन्हा तेच! रेल्वे म्हणतंय लोकलचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवलाय!

सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू करण्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. मात्र या प्रस्तावावर रेल्वे बोर्डाकडून नेमकी कोणती प्रतिक्रिया, उत्तर येतं हे पाहणं अवघ्या मुंबईकरांसाठी प्रतिक्षेचं असणार आहे

Passes will be available at 53 railway stations in Mumbai from १५ August, offline system announced by Mumbai BMC
मुंबईच्या ५३ रेल्वे स्थानकांवर मंगळवारपासून पास मिळणार, ऑफलाईन पद्धत पालिकेकडून जाहीर

गेल्या कित्येक महिन्यांपासून मुंबईची लाईफलाईन असणारी मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी कधी पुन्हा रुळावर धावणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान सर्वसामान्य मुंबईकरांची ही प्रतीक्षा अखेर आज संपली आहे. १ फेब्रुवारीपासून मुंबई लोकल सर्वांसाठी खुली करण्यात येणार आहे, असे राज्य सरकारकडून सांगण्यात आले असून मुंबईची लोकल ही सर्वसामान्य प्रवाशांसाठी खुली करण्यास परवानी देण्यात आली आहे. १ फेब्रुवारीपासून गर्दी होणार नाही अशा वेळा आखून सर्वसामान्य प्रवाशांसाठी उपनगरीय सेवा सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. यामुळे सर्वांना यातून प्रवास करता येईल तसेच त्यांची होणारी गैरसोयही टळणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मात्र रेल्वे प्रशासनाकडून अद्याप यासंदर्भातील कोणताही निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही. राज्य सरकारकडून सर्वसामान्यांकरता रेल्वे सुरू करण्यात यावी, अशी विनंती देखील करण्यात आली होती, मात्र रेल्वे प्रशासनाकडून कोणताही निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही. तर सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू करण्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला असल्याचे  रेल्वे प्रशासनाकडून असे सांगण्यात येत आहे.

लोकल सुरू करण्यासाठी रेल्वे प्रशासन सज्ज, पण…

गेल्या काही दिवसांपूर्वी सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरू करण्यासाठी रेल्वे प्रशासन सज्ज असून लोकलमध्ये होणाऱ्या गर्दीमुळे राज्य सरकारला काळजी वाटत असल्याने राज्यात पुन्हा लोकल सुरू करण्याच्या की नाही या विचारात सरकार आहे, असे सांगितले जात होते. दरम्यान, मुंबई एमएमआर रिजनमधील कोरोनाचा आढावा घेऊन शाळा आणि लोकल ट्रेन सुरू करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिल्यानंतर मध्य रेल्वेनं महत्त्वाची माहिती दिली होती. सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू करण्यासाठी रेल्वे प्रशासन सज्ज आहे. मात्र यासंदर्भात पुढील निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारच्या परवानगीची प्रतीक्षा करत आहोत, अशी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांनी एका वृत्तसंस्थेला माहिती दिली होती.

 

 

दरम्यान, कोरोनादरम्यान अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि महिला प्रवाशांसाठी लोकलचा प्रवास रेल्वेने सुरू केला होता. यांनतर १ फेब्रुवारीपासून राज्य सरकारने सर्वसामान्यांना मुंबई लोकलमधून प्रवास करण्याची जरी परवानगी दिली असली तरी, सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू करण्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. मात्र या प्रस्तावावर रेल्वे बोर्डाकडून नेमकी कोणती प्रतिक्रिया, उत्तर येतं हे पाहणं अवघ्या मुंबईकरांसाठी प्रतिक्षेचं असणार आहे.