घरताज्या घडामोडीराणी बागेला पेंग्विनमुळे ५ वर्षात २६ कोटींची कमाई; ७२ लाख पर्यटकांची भेट

राणी बागेला पेंग्विनमुळे ५ वर्षात २६ कोटींची कमाई; ७२ लाख पर्यटकांची भेट

Subscribe

मुंबईतील भायखळा येथील पर्यटकांचे आवडते पर्यटनस्थळ म्हणजे राणीची बागेला (वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय) आंतरराष्ट्रीय दर्जाचे झू पार्क बनविण्यासाठी मोठया प्रमाणात विकासकामे सुरू आहेत.

मुंबई : मुंबईतील भायखळा येथील पर्यटकांचे आवडते पर्यटनस्थळ म्हणजे राणीची बागेला (वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय) आंतरराष्ट्रीय दर्जाचे झू पार्क बनविण्यासाठी मोठया प्रमाणात विकासकामे सुरू आहेत. त्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात १४० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. (Rani Bagh earn 26 crore in 5 years due to Penguin)

या राणीच्या बागेत २०१७ च्या सुमारास विदेशातून बर्फाळ प्रदेशातील पेंग्विन आणल्यापासून म्हणजे २०१७ ते २०२२ (२०२० – २१ राणी बाग कोरोनामुळे बंद) अवघ्या ५ वर्षात राणी बागेला ७१ लाख ४६ हजार ४८ पर्यटकांनी भेट दिली. त्यामुळे पालिकेला तब्बल २६ कोटी ४६ लाख २७ हजार ३३ रुपयांची कमाई झाली. मात्र राणीच्या बागेत पेंग्विन आणण्यापूर्वी म्हणजे म्हणजे २०१४ – १५ ते २०१६ – १७ या ३ वर्षांच्या कालावधीत ३८ लाख ७२ हजार २०२ पर्यटकांनी भेटी दिल्या. त्यातून पालिकेला फक्त २ कोटी १० लाख ७२ हजार १६९ रुपयांची कमाई झाली होती.

- Advertisement -

मुंबईत देशविदेशातून दररोज शेकडो पर्यटक पर्यटनाला येत असतात. या पर्यटकांचे मुंबईतील आवडत्या पर्यटन स्थळांपैकी एक स्थळ म्हणजे भायखळा येथील राणीची बाग हे होय. ५३ एकर क्षेत्रात पसरलेल्या राणीच्या बागेला १८ नोव्हेंबर २०२२ रोजी तब्बल १६० वर्षे पूर्ण झाली. पूर्वी राणीच्या बागेत हत्ती, साप, विविध पक्षी, मगर, वाघ, गेंडा, सांबर आदी प्राणी बघण्यासाठी शेकडोंच्या संख्येने लोक येत असत. रविवारी सार्वजनिक सुट्टी अथवा सणासुदीच्या दिवशी सुट्टी असतानाही पर्यटकांची संख्या काही प्रमाणात वाढत असे.

दरमहा १ लाख याप्रमाणे वर्षभरात किमान १२ लाख पर्यटक भेट देत असत. त्यामुळे पालिकेला वर्षभरात ६७ लाख ते ७० लाख रुपयांची कमाई होत असे. मात्र तब्बल ४५ कोटी रुपये खर्चून पेंग्विन पक्षी कक्ष व परिसर उभारला गेला व मार्च २०१७ पासून जेव्हा राणीच्या बागेत ‘पेंग्विन’ आणण्यात आले तेव्हापासून राणी बागेच्या प्रवेश शुल्कात वाढ करण्यात आली. मात्र तरीही राणी बागेत येणाऱ्या} पर्यटकांच्या संख्येत दुप्पट, तिप्पट वाढ झाली. तसेच, पालिकेच्या उत्पन्नातही कोट्यवधी रुपयांची वाढ होऊ लागली आहे.

- Advertisement -

राणीच्या बागेत सध्या देश – विदेशातून प्राणी, पक्षी आणले जात आहेत. अद्यापही राणी बागेचे आधुनिकीकरण काम सुरू आहे. त्यासाठी २०२१ – २२ या आर्थिक वर्षात पालिकेने २६.७२ कोटी रुपये खर्च केले होते. तर २०२२ – २३ मध्येही सदर कामे पुढे सुरू ठेवण्यासाठी तब्बल ११० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. मात्र कोरोना संसर्गामुळे कामावर काहीसा परिणाम झाला व सदर निधीमधून आतापर्यंत २४ कोटींचा खर्च करण्यात आला असून तो ५६ कोटींपर्यंत जाईल.

मार्च २०२३ पर्यन्त राणी बागेत पाणमांजर प्रदर्शनी व मगर आणि सुसर अंडरवॉटर प्रदर्शनीचे बांधकाम पूर्ण कऱण्यात येणार आहे. तसेच, राणीच्या बागेला परिसरातील आणखीन दोन भूखंडे प्राप्त झाली असून त्या जागेत लवकरच राणी बागेचा विस्तार करून तेथे विदेशी प्राण्यांची प्रदर्शनी उभारण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे, पेंग्विन कक्षासमोर ऍक्वा गॅलरी व परिसरातील रस्त्यांची कामे करण्यात येणार आहेत.

राणी बागेत भेट देणारे पर्यटकांची संख्या व उत्पन्न यांची वर्षनिहाय माहिती

वर्ष               पर्यटक संख्या           उत्पन्न – रुपये

२०१४-१५        १२,४०,७८२             ६७,०३,४४९
२०१५-१६        १२,५१,१४९              ७०,०३,२५६
२०१६-१७        १३,८०,२७१             ७३,६५,४६४
२०१७-१८        १७,५७,०५९            ४,३६,६६,९९८
२०१८-१९        १२,७०,०२७             ५,४२,४६,३५३
२०१९-२०        १०,६६,०३६             ४,५७,४६,१५०
२०२०-२१        कोरोना संसर्गामुळे बंद
२०२१-२२        ७,२५,१०१              ३,००,५९,९९५
२०२२ –          २३ २३,२७,८२५         ९,०९,०७,५३६
एकूण :          १,१०,१८,२५०          २८,५६,९९,२०२


हेही वाचा – ऐकावं ते नवलच! डिपॉझिट भरण्यासाठी उमेदवाराने आणली चिल्लर; मोजताना अधिकाऱ्यांची नाकीनऊ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -