घरमुंबईमुंबईत आढळला दुर्मिळ निमविषारी साप

मुंबईत आढळला दुर्मिळ निमविषारी साप

Subscribe

हा साप उष्ण,कोरडा आणि वाळवंटी परिसरात अढळतो. हा सर्प निमविषारी आहे. सर्पाची लांबी अडीच फुट आहे. हा साप मुंबईत आढळल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहे.

मुंबईच्या चर्नीरोडमध्ये ‘ग्लॉसी बॅलिड रेसर’ नावाचा निमविषारी साप आढळला आहे. सर्वात वेगाने धावणारा हा सर्प असल्यामुळे याला रेसर असं म्हटलं जातं. आतापर्यंत हा सर्प मुंबईत कधीच आढळला नव्हता. हा सर्प पहिल्यांदाच मुंबईत सापडल्याचा दावा ‘सप्रेडिंग अवेयरनेस अन रेप्टाइल्स अण्ड रिहॅबिलिशन प्रोग्राम’ या संस्थेने केला आहे.

हा साप उष्ण,कोरडा आणि वाळवंटी परिसरात अढळतो. हा सर्प निमविषारी आहे. सर्पाची लांबी अडीच फुट आहे. हा साप मुंबईत आढळल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. मुंबईत चर्नी रोड भागात जंगल नाही. अमित मकवान यांनी सर्पाची माहिती सर्प संस्थेला दिली. सर्पाची सुटका सर्पमित्र अनुज खानविलकर यांनी केली.

- Advertisement -
glocy bailid resar
निमविषारी साप

 

सर्पाला जखम झाल्यामुळे तो वेगाने धावू शकत नव्हता. नागरिकांनी पकडून सुरक्षीत ठेवण्यात आले होते. सर्प संस्थेला सर्पाची माहिती देण्यात आली आहे. सर्पावर पुढील उपचार सुरू आहेत. गुजरात, राजस्थान, उत्तराखंड, हिमालय येथे हा सर्प आढळून येतो. दिल्लीमध्ये २०१२ साली हा सर्प आढळून आला होता. पाल,सरडा आणि बेडूक असं त्याच खाद्य आहे. उपचारानंतर या सापाला मुंबईतील जंगलात न सोडता. त्याच्या मुळ अधिवासात सोडण्यात येणार आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -