घरमुंबईट्रकने धडक दिल्याने रे रोडच्या पूलाला धोका

ट्रकने धडक दिल्याने रे रोडच्या पूलाला धोका

Subscribe

हार्बर रेल्वे मार्गावरील रे रोडवरील पुलाच्या खांबांनाच ट्रकने धडक दिल्याने या पुलाला धोका निर्माण झाला असून हा पूल तात्काळ बंद करण्यात आला आहे.

हार्बर रेल्वे मार्गावरील रे रोडवरील पुलाच्या खांबांनाच ट्रकने धडक दिल्याने या पुलाला धोका निर्माण झाला आहे. या दुघर्टनेनंतर तात्काळ पूल बंद करण्यात आले आहे. पूल बंद करण्यात आल्यामुळे यावरून जाणारी वाहतूक अन्य मार्गाने वळण्यात आल्याने या परिसरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. या पुलाच्या पाहणीसाठी महापालिकेने तात्काळ स्ट्रक्चरल ऑडीटरची नेमणूक केली आहे. रात्रीपर्यंत त्याचा अहवाल अपेक्षित आहे. त्यामुळे जर अहवालात पुलाचे काम करणे आवश्यक असल्यास तातडीने कामाला सुरुवात केली जाईल. परंतु, तोपर्यंत हे पूल बंद राहणार असल्याने अनंत चतुर्दशीच्या पूर्व संध्येलाच ही दुघर्टना घडल्यामुळे दक्षिण मुंबईत वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे.

पुलाचे खांब उखडल्याने वाहतुकीसाठी बंद

रे रोड येथील रेल्वे पुलाखालून जाणार्‍या एका भरघाव ट्रकने सकाळी साडेबाराच्या सुमारास धडक दिली. या धडकेमुळे पुलाचा लोखंडी खांब वाकून उखडला गेला आहे. त्यामुळे या पुलालाच धोका निर्माण झाल्याने तात्काळ या रस्त्यांवरील तसेच पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली. हे पूल धोकादायक असल्याने मोठ्या प्रमाणात दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार होते. यासाठीची निविदा प्रक्रिया राबवण्यात आली आहे. परंतु या पुलावर अनधिकृत झोपड्या वसल्यामुळे त्या तोडण्यात येणार्‍या अडचणी यामुळे पुलाच्या दुरुस्तीचे काम थांबले होते. परंतु या अपघातामुळे या पुलाच्या दुरुस्तीचे काम आता हाती घ्यावे लागणार आहे.

- Advertisement -

महापालिका पूल विभागाचे प्रमुख अभियंता संजय दराडे यांनी अपघात झाल्याने हा पूल बंद करण्यात आला आहे. हे पूल आधीच धोकादायक असल्याने त्याची मोठ्या स्वरुपात दुरुस्ती करण्याचे स्ट्रक्चरल ऑडीटच्या अहवालात नमुद करण्यात आले होते. त्यानुसार याची दुरुस्ती करण्यात येणार आहे. परंतु या अपघातानंतर तात्काळ स्ट्रक्चरल ऑडीटरची नेमणूक करून त्यांना अहवाल बनवण्यास सांगितले आहे. त्यांच्या अहवालानंतर पुढील कार्यवाही केली जाईल, असे त्यांनी सांगितले. सल्लागाराच्या अहवालानंतर, तात्काळ दुरुस्ती करायची असल्यास खांब बसवण्याची कार्यवाही केली जाईल. परंतु यासाठी झोपड्या हटवणे आवश्यक आहे. झोपड्या हटवल्यानंतरच पुलाच्या वरील भागाचीही तपासणी केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

धोकादायक ७ पुलांच्या दुरुस्ती तातडीने

हिमालय पुलाच्या दुघर्टनेनंतर मुंबईतील पुलांचा पुन्हा सर्वे करण्यात आला. या सर्वेमध्ये एकूण १० पूल धोकादायक असल्याने वाहतुकीसाठी बंद करण्यात आले. तर काही पूल हलक्या वाहनांसाठी खुले ठेवण्यात आले आहे. त्यामुळे या पुलांच्या दुरुस्तीसाठी निविदा मागवण्यात आली असून ओशिवरा, घाटकोपर लक्ष्मीबाग नालासह तीन पूल वगळता अन्य ७ पुलांच्या दुरुस्तीसाठी कंत्राटदारांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये हंसभुग्रा येथील पाईपलाईन रस्त्यावरील पूल, जुहूतारा रोडवरील एसएनडीटी कॉलेजवळील पूल, धोबीघाट येथील मजास नाल्यावरील पूल, मेघवाडी जंक्शन येथील मजास नाल्यावरील पूल, पिरॅमल नाल्यावरील ईन ऑर्बिट मॉलजवळील पूल, मालाड लिंक रोडवरील डी मार्ट जवळील पूल, बोरीवली रतन नगर येथील दहिसर नदीवरील पूल आदी पुलांचा समावेश आहे. यासर्व पुलांच्या दुरुस्तीसाठी कंत्राटदारांची निवड करण्यात आली. यासाठी तब्बल ९५ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – रे रोड स्थानकांवरून जाणारा पूल वाकला; काही दिवसांसाठी वाहतूक बंद


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -