घरमुंबईतस्करीसाठी आणलेल्या कासवांची सुटका; एकाला अटक

तस्करीसाठी आणलेल्या कासवांची सुटका; एकाला अटक

Subscribe

२० कासव आणि एका पोपटाची प्राणी मित्र संघटनानी सुटका केली. याप्रकरणी एका आरोपीला पोलिसांनी अटक केली असून त्याची चौकशी सुरु आहे.

मुंबईतील क्रॉफर्ड मार्केटमध्ये तस्करीसाठी आणलेल्या २० कासव आणि एका पोपटाची सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणी बिलाल मोहम्मद शेख (वय २९) याला शनिवारी पोलिसांनी अटक केली. तसेच त्याच्याकडे असलेले २० कासव आणि एक पोपट जप्त करण्यात आले. वनविभाग, वाइल्ड लाइफ वेल्फेअर असोसिएशन, वाइल्ड लाइफ क्राईम कंट्रोल ब्युरो आणि स्पेडिंग अवेअरनेस ऑन रिप्टाइल्स अँड रिहॅबिलिशन प्रोग्राम या सर्व पथकांनी कारवाई केली. भारतामध्ये कासवाची तस्करी करणे हा गुन्हा आहे. वनविभाग आणि या संघटनांना कासव आणि पोपटाची तस्करी केली जात असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यांनी ही कारवाई केली आहे.

- Advertisement -

याआधी देखील पोलिसांनी आरोपीवर पशू-पक्षांची तस्करी करताना कारवाई केली होती. आरोपी बिलाल मोहम्मद शेख याच्या मोबाईलमध्ये कासव आणि पोपट यांचा व्हिडिओ सापडला आहे. यामुळे आरोपीचा मोबाईल देखील पोलिसांनी जप्त केला आहे. तसंच आरोपीच्या घरातून एका पोपटाला जप्त करण्यात आले आहे.

वनअधिकारी युवराज गीते, वाइल्ड लाइफ वेल्फेअर असोसिएनचे ओंकार कोलेकर, निखिल महाजन, स्वप्निल वीर, आदित्य पाटील, वाइल्ड लाइफ क्राईम ब्युरोचे विजय नंदेश्वर, ललित पवार आणि सर्प संस्थेचे अरबाज खान, अकबर शेख, अनुज खानविलकर, कुणाल हबडे या सर्व प्राणी मित्र संघटनांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -