घरमुंबईक्यार आणि महा चक्रीवादळग्रस्त मच्छिमार कुटुंबातील प्रत्येक नुकसानग्रस्ताला मिळणार पॅकेज

क्यार आणि महा चक्रीवादळग्रस्त मच्छिमार कुटुंबातील प्रत्येक नुकसानग्रस्ताला मिळणार पॅकेज

Subscribe

मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांचा महत्त्वपूर्ण निर्णय

‘क्यार’ व ‘महा’चक्रीवादळग्रस्त मच्छीमारबांधवांना जाहीर करण्यात आलेले मदतीचे पॅकेज आता एकाच कुटुंबातील स्वतंत्र व्यवसाय करणा-या सर्व पात्र सदस्यांना देण्यात येणार आहे. पूर्वी एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला मदत मिळणार होती. ‘क्यार’ व ‘महा’चक्रीवादळग्रस्त मच्छीमारबांधवांना दिलासा देण्यासाठी व ऑगस्ट ते ऑक्टोबर २०१९ मध्ये वादळी हवामानामुळे मासेमारी करता न आल्यामुळे आर्थिक संकटाला निर्माण झाले आहे. या नुकसानग्रस्त मच्छीमार बांधवांसाठी राज्य सरकारने ६५ कोटी १७ लाख २० हजारांचे पॅकेज जाहीर केले होते. प्रत्येक कुटुंबातील एकाच व्यक्तीला या पॅकेजला फायदा देण्यात येणार होता. पण या पॅकेजमधील काही निकष,अटी व शर्तींमुळे मच्छीमारांना या पॅकेजचा फायदा मिळण्यास अडचणी निर्माण होत होत्या.

लोकप्रतिनिधी, मच्छीमार सहकारी संस्था, पारंपारिक मच्छीमार यांनी या निकषांमध्ये बदल करण्याची मागणी सातत्याने लावून धरली होती. त्यानुसार ही अट काढून टाकण्याचा निर्णय मत्स्यव्यवसाय मंत्री अस्मल शेख यांनी ही अट काढून टाकली आहे. त्याशिवाय मत्स्यपॅकेजचा फायदा मिळण्यासाठी राष्ट्रीयकृत बॅंकेतच खाते असण्याची अटही शिथिल करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत खाते असणाऱ्या पात्र लाभार्थांनांही मत्स्य पॅकेजचा लाभ मिळू शकेल. राज्यात १३ हजार ८३८ यांत्रिकी मासेमारी नौका व १ हजार ५६४ बिगर यांत्रिकी मासेमारी नौका अशा एकूण १५, हजार ४०२ मासेमारी परवानाधारक मासेमारी नौका आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ९६ पारंपारिक पद्धतीने मासेमारी करणारे रापणकर संघ आहे. आता निकषांमध्ये झालेल्या बदलांमुळे मत्स्यपॅकेजचा लाभ मिळण्याचा मार्ग सुलभ होणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा- मालमत्ता करापोटी १ हजार ७१४ कोटी थकीतच

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -