घरमुंबई'तो' मेसेज चुकीचा; सार्वजनिक क्षेत्रातील बँका बंद होणार नाहीत - RBI

‘तो’ मेसेज चुकीचा; सार्वजनिक क्षेत्रातील बँका बंद होणार नाहीत – RBI

Subscribe

सार्वजनिक क्षेत्रातील काही प्रमुख बँकांच्या नावाचा उल्लेख असलेला एक मेसेज सोशल मीडियावर फिरत आहे. यावर आरबीआयने स्पष्टीकरण दिले आहे.

पंजाब महाराष्ट्र बँकेवर (पीएमसी) आरबीआयनं निर्बंध लादल्यानंतर खातेदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला. त्यानंतर सोशल मीडियावर सार्वजनिक क्षेत्रातील काही बँका कायमस्वरूपी बंद होणार आहेत, असा मेसेज व्हायरल झाला आहे. मात्र, सोशल मीडियावर फिरणारे मेसेज चुकीचे आहेत असे सांगत सार्वजनिक क्षेत्रातील बँका बंद होणार नाहीत, असे स्पष्टीकरण आरबीआयने दिले आहे. दरम्यान सार्वजनिक क्षेत्रातील काही प्रमुख बँकांच्या नावाचा उल्लेख असलेला एक मेसेज सोशल मीडियावर फिरत आहे.

हेही वाचा – ठाणे, दिव्यात पीएमसी बँकेवर ग्राहकांची गर्दी; खातेदार अस्वस्थ

काय आहे प्रकरण?

पीएमसी बँकेवर आरबीआयने निर्बंध लादल्यानंतर खातेदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला. त्यानंतर सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल झाला आहे. या मेसेजमध्ये आरबीआय सार्वजनिक क्षेत्रातील नऊ बँका कायमस्वरुपी बंद करणार आहे, असे लिहिण्यात आले आहे. त्यामुळे या बँकांच्या ग्राहकांनी त्यांच्या खात्यांमधून आताच पैसे काढा असे या व्हायरल मेसेज मध्ये म्हटले आहे. विशेष म्हणजे या मेसेजमध्ये नऊ बँकांच्या नावाने उल्लेख करण्यात आला आहे. यामध्ये युको बँक, आयडीबीआय, बँक ऑफ महाराष्ट्र, आंध्रा बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, देना बँक आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया या बँकांच्या नावाचा समावेश आहे. यावर आरबीआयने स्पष्टीकरण दिले आहे. अर्थसचिव राजीव कुमार यांनी ट्विट करत माहिती दिली. ट्विटमध्ये ते म्हणाले की, “सोशल मीडियावर फिरत असणारा मेसेज म्हणजे अफवा आहे. बँका बंद करण्याचा प्रश्नच नाही. बँकांना बळकटी देण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे.”

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -