घरताज्या घडामोडीरोहित पवारांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट, मंत्रालयात १५ मिनिटे चर्चा

रोहित पवारांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट, मंत्रालयात १५ मिनिटे चर्चा

Subscribe

मुंबई – भाजपा नेते मोहित कंबोज (BJP Leader Mohit Kamboj) यांनी राष्ट्रवादीविरोधात मोहिम उघडल्यानंतर रोहित पवारांनी (Rohit Pawar) आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रोहित पवार यांच्या आज १० ते १५ मिनिटांची चर्चा झाली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. मोहित कंबोज यांनी रोहित पवार यांच्यावर आरोप केला होता, त्यानंतर ही भेट झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

दरम्यान, युरोपमध्ये जगदंबाची तलवार आहे, अनेक वस्तू भारताबाहेर आहेत. त्या भारतात आणण्यासाठी आम्ही चर्चा केली. पोलिसांच्या सुट्टीबद्दलही आमच्यात चर्चा झाली, अशी माहिती रोहित पवार यांनी माध्यमांना दिली

- Advertisement -

हेही वाचा – महाराष्ट्र पिंजून काढत सरकारविरोधात रान पेटवणार, शरद पवारांची मोठी घोषणा

रोहित पवार मोहित कंबोज यांच्या निशाण्यावर

बारामती अॅग्रो लिमिटेड कंपनीच्या केस स्टडीचा मी सध्या अभ्यास करत आहे. मी वैयक्तिकरित्या या कंपनीच्या उपलब्धींचा अभ्यास करण्यास सुरुवात केली आहे. यामागची यशोगाथा समजून घेण्यास तरुणांना मदत करणारा संक्षिप्त अभ्यास लवकरच शेअर करणार आहे.’ असं ट्विट मोहित कंबोज यांनी केलं होतं. त्यामुळे कंबोज आता रोहित पवार यांना टार्गेट करत आहेत.

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी देखील कंबोज यांच्यावर निशाणा साधला आहे. मोहित कंबोज यांनी सामान्य नागरिकांचा पैसा असलेल्या दोन-तीन बँकांना चुना लावला आहे, त्यामुळे त्यांच्या ट्वीटला किती महत्त्व दिलं पाहिजे? हे आपण समजून घेतलं पाहिजे, असा टोला रोहित पवार यांनी लगावला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -