घरमुंबईसावरकर आमचेच ही राऊतांची भूमिका दुर्देवी, रणजीत सावरकरांचा आरोप

सावरकर आमचेच ही राऊतांची भूमिका दुर्देवी, रणजीत सावरकरांचा आरोप

Subscribe

मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी आपल्या राजकारणासाठी नेहमी सावकरांवर टीका करताना आपल्याला दिसतात. राहुल गांधींचे लोकसभा सदस्यत्व गेल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत म्हटले होते की, माझे नाव सावरकर नाही, माझे नाव गांधी आहे आणि गांधी कोणाची माफी मागत नाहीत. हे प्रकरण सुरू असतानाच संजय राऊत यांनी आज सकाळी वक्तव्य केले की, गद्दारांना सावरकरांचे नाव घेण्याचा अधिकार नाही, सावरकर केवळ आमचेच आहेत. या वक्तव्यानंतर सावकरांचे पणतु रणजीत सावरकर यांनी पत्रकार परिषद घेत सावरकरांचा राजकारणासाठी वापर दुर्देवी असल्याचे म्हणाले आहेत.

रणजीत सावरकर म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून सावरकरांवर राजकीय वर्तुळात जी काही चर्चा सुरू आहे ती दुर्देवी आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी सावकरांचा वापर केवळ राजकारणासाठी करत आहेत. त्यांना वाटते की, सावरकर हिंदुत्ववादी प्रेणेते असल्यामुळे त्यांना विरोध केला तर मुसलमान आपल्या पाठीशी उभे राहतील. अश्या दृष्टीने ते मुस्लिम पुनर्वादांना आपल्या बाजूने करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप रणजीत सावरकर यांनी केला आहे.

- Advertisement -

राजकारणासाठी एका राष्ट्रभक्ताचा अश्या प्रकारे वापर होणे अत्यंत गंभीर आहे. राहुल गांधींसोबत काही हिंदुत्ववादी पक्षसुद्धा त्यांच्या अंतर्गत राजकारणासाठी सावरकरांचा वापर करत आहेत ही दुर्दैवाची गोष्ट आहे, असे रणजीत सावकर म्हणाले. आज संजय राऊत यांनी वक्तव्य केले की, गद्दारांना सावरकरांचे नाव घेण्याचा अधिकार नाही. त्यामुळे संजय राऊतांना मी सांगू इच्छितो की, बाळासाहेबांनी सावरकर स्मारकांसाठी जागा मिळवून देण्यासाठी खूप प्रयत्न केले. कारण बाळासाहेबांना सावरकरांबद्दल खूप आदर होता. मणिशंकर अय्यर यांनी सावकरांबद्दल अपशब्द वापरल्यामुळे बाळासाहेबांनी त्यावेळी जोडो मारो आंदोलनही केले. त्यामुळे बाळासाहेबांसारखा कर्तुत्ववान व्यक्तीचा वारसा घेणारे, त्यांचे नाव सांगणाऱ्या संजय राऊतांनी सावरकर केवळ आमचेच आहेत, अशी जी भूमिका घेणे दुर्देवी आहे, असेही रणजीत सावरकर म्हणाले.

त्यांनी वेळी एक गोष्ट निर्देशनास आणून दिली की, सावरकर स्मारकात जयंतराव टीळक हे काँग्रेसचे नेते तत्कालीन विधानपरिषदेचे सभापती होते आणि ते स्मारकाचे अध्यक्षही होते. त्यांच्यामुळे सावरकरांचा आधार बाळगणारे लोक आजही काँग्रेसमध्ये आहेत. पण दुर्देवाने ते काँग्रेसमध्ये असून आवाज उठवत नसतील आणि काही कृती करत नसतील तर त्याला काही अर्थ नाही आहे, असेही रणजीत सावरकर म्हणाले.

- Advertisement -

ते म्हणाले की, शिवसेनेत जी फुट पडली त्याचे सर्वांनाच दु:ख असून हिंदुत्ववादी पक्षात फुट पडणे ही दु:खद गोष्ट आहे. आजही शिवसेनेचे कार्यकर्ते मला भेटतात. सावकरांबद्दल शिवसेनेने आजपर्यंत जे बोटचेपी धोरण राबवत होते त्याचे त्यांनाही दु:ख आहे. उद्धव ठाकरेंनी सावकरांचा अपमान सहन करणार नाही ही जी भूमिका घेतली ती स्वागर्ताह असली तरी त्यांनी स्वत: मुख्यमंत्री असताना काँग्रेसवर कोणतीच कारवाई केली नसल्याची खंतही आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे मुखपत्र ‘शिदोरी’ या मासिकात सावरकरांवर अत्यंत आक्षेपार्ह, अश्लील भाषेत लेख आला होता. तेव्हा मी उद्धव ठाकरेंना पत्र लिहिली, त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी मला भेट दिली नाही आणि माझ्या पत्रांनाही उत्तर दिले नाही. ते मुख्यमंत्री असताना काँग्रेसवर बदनामीची कारवाई करू शकले असते.

एका अभिनेत्रीने शरद पवारांची बदनामी केली, तेव्हा तिला उद्धव ठाकरेंनी जेलमध्ये पाठवून शरद पवारांना न्याय दिला गेला. पण ती अभिनेत्री शरद पवारांबद्दल आक्षेपार्ह काहीच बोलली नव्हती. मात्र सावरकरांवर अश्लील भाषेत टीका होऊन देखील उद्धव ठाकरेंनी ती मान्य केली नाही. कारण काँग्रेससोबत त्यांनी सत्ता स्थापन केली होती, असेही रणजीत सावरकर म्हणाले.

ते म्हणाले की, तुमच्या मनात सावरकरांबद्दल प्रेम असेल तर ते व्यक्तीगत मान्य करा. कारण प्रेम जोपर्यंत कृतीत उतरत नाही तोपर्यंत त्याला काही अर्थ नाही. आज जे कोणी सावरकरांचा अपमान होताना लढायला पुढे येत ते खरे स्वातंत्र्यवादी आहेत असे माझे स्पष्ट मत असल्याचेही रणजीत सावरकर म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -