घरताज्या घडामोडीमहाराष्ट्रात करोनाचा दुसरा बळी; करोनाबाधित रुग्णांची संख्या ६४ वरुन ७४ वर

महाराष्ट्रात करोनाचा दुसरा बळी; करोनाबाधित रुग्णांची संख्या ६४ वरुन ७४ वर

Subscribe

महाराष्ट्रात करोना रुग्णाचा आकडा वाढला असून थेट ६४ वरुन ७४ पोहचला आहे. शिवाय सर्वात महत्वाचे म्हणजे महाराष्ट्रात करोनामुळे दुसरा बळी गेला आहे.

महाराष्ट्रात करोना रुग्णाचा आकडा वाढला असून थेट ६४ वरुन ७४ पोहचला आहे. शिवाय सर्वात महत्वाचे म्हणजे महाराष्ट्रात करोनामुळे दुसरा बळी गेल्याचे सांगितले जात आहे.

मुंबईत करोनामुळे २ मृत्यू

- Advertisement -

मुंबईत आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाला आहे. तर महाराष्ट्रात १० नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. मुंबईत ६ आणि पुण्यातून ४ जण करोनाबाधित असल्याचे समोर आले आहे. यामधील ५ जणांनी इतर देशांतून प्रवास केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महाराष्ट्राची एकूण संख्या ६४ वरुन ७४ वर गेली आहे.

तर रिलायन्स हाॅस्पिटलमध्ये ६३ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला असून १९ मार्चला ही व्यक्ती खासगी हाॅस्पिटलमध्ये दाखल झाली होती. पण शनिवारी, रात्री उशिरा या व्यक्तिचा मृत्यू झाला आहे. या व्यक्ती वेगवेगळ्या आजारांनी ग्रासली होती. पण, करोना पॉझिटिव्ह असल्याचे ही डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. त्यांना श्वास घ्यायला त्रास होत होता. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Coronavirus: करोनासाठी सरकारी हॉस्पिटलमध्ये फिवर ओपीडी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -