घरमुंबईअयोध्येला उद्धव ठाकरेंची सभा नाही - संजय राऊत

अयोध्येला उद्धव ठाकरेंची सभा नाही – संजय राऊत

Subscribe

गेल्या काही दिवसांपासून अयोध्या दौऱ्यामध्ये उद्धव ठाकरे जाहीर सभा घेणार अशा चर्चा होत्या. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या नेत्यांमध्ये चढाओढ देखील असल्याची माहिती बाहेर आली होती. मात्र, आता संजय राऊत यांनीच उद्धव ठाकरेंची जाहीर सभा होणार नसल्याची माहिती दिली आहे.

येत्या २५ नोव्हेंबरला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार आहेत. त्यावेळी ते तिथे सभा घेणार असल्याची जोरदार चर्चा होती. मात्र, आता ते तिकडे जाऊन सभा घेणार नसल्याचं शिवसेनेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. ‘अयोध्येत आम्ही सभेसाठी परवानगी मागितलीच नाही’, असं संजय राऊत म्हणाले आहेत. त्यामुळे अयोध्या दौऱ्यात उद्धव ठाकरेंची कोणतीही सभा आता होणार नाहीये. उद्धव ठाकरेंच्या नियोजित दौऱ्यात सभेचं कोणंतंही आयोजन नाही. अयोध्येत राम मंदिर बांधावे ही शिवसेनेची जुनी मागणी धसास लावण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख येत्या २४ नोव्हेंबरला दुपारी खास विमानाने अयोध्येला जाणार आहेत.

२४ तारखेला विशेष विमानाने अयोध्येला जाणार!

‘चलो अयोध्या’चा नारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात दिला होता. त्यानुसार २५ नोव्हेंबरला ‘चलो अयोध्या’ असा नारा देत शिवसेनेने राज्यात जोरदार शक्ती प्रदर्शन करत जय्यत तयारी सुरू केली आहे. उद्धव ठाकरे यांच्याबरोबर शिवसेनेचे निवडक १०० नेते अयोध्येला २४ तारखेला जाणार असून राज्यातून शिवसेनेचे सुमारे २५ हजार निवडक पदाधिकारी अयोध्येला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर मुंबईसह राज्यातील शिवसेनेच्या आमदार आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांवर राज्यातील महाआरतीची जबाबदारी सोपवण्यात आल्याचे समजते. याव्यतिरिक्त राज्यातून हजारो शिवसैनिक अयोध्येला आपली वाहने, रेल्वे, विमानाने जाणार आहेत. रेल्वे आणि विमानाची सर्व तिकीटे आधीच संपली आहेत.

- Advertisement -

व्हिडिओ पाहा काय म्हणतायत उद्धव ठाकरे – अयोध्या वारीवर शिवसेनेत मतभेद नाहीत

शिवसेनेत सुरू होती चढाओढ!

दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावरून शिवसेनेच्या नेत्यांमध्ये चढाओढ असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. अयोध्येमध्ये उद्धव ठाकरेंनी जाहीर सभा घेण्यावरून खासदार संजय राऊत आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये चढाओढ लागल्याचं चित्र दिसून आलं. यानंतर अखेर उद्धव ठाकरेंनी स्वीय सचिव मिलिंद नार्वेकर यांनाच दौऱ्याची देखरेख करण्यासाठी पाठवल्याचं देखील सूत्रांनी सांगितलं. उद्धव ठाकरेंनी मात्र पत्रकार परिषदेमध्ये शिवसेनेत सारं काही आलबेल असल्याचंच सांगून या चर्चांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -