घरCORONA UPDATEमग धनंजय मुंडेंची दोन वेळा कोरोना चाचणी का? - किरीट सोमय्या

मग धनंजय मुंडेंची दोन वेळा कोरोना चाचणी का? – किरीट सोमय्या

Subscribe

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांची दुसरी चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर आज त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. मात्र आता यावरून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांची दोन वेळा कोरोना टेस्ट केली. मग सर्वसामान्यांची एकदाच टेस्ट का करण्यात येते, हा दुजाभाव का?” असा प्रश्न उपस्थित केला आहे.

“धनंजय मुंडे यांची दोन वेळा कोरोना चाचणी करण्यात आली. सामान्यांची मात्र एकदा टेस्ट करण्यात येते, हा दुजाभाव का? कमीत कमी चाचण्या करण्याचे शासनाचे धोरण आहे. मात्र धनजंय मुडे हे एकदा पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्यात लक्षणे न आढळल्याने त्यांची पुन्हा टेस्ट करण्यात आल्याचे सोमय्या यावेळी म्हणाले. तसेच आरोग्यमंत्री राजेश टोपे याचे उत्तर देणार का, असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.

- Advertisement -

दरम्यान, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना आज दुपारी ब्रीच कँडी रुग्णालयातून चार वाजण्याच्या सुमारास डिस्चार्ज देण्यात आला आहे. मागील अकरा दिवसांपासून ते या रुग्णालयात कोरोनाच्या आजारामुळे दाखल होते. दोन दिवसांपूर्वीच त्यांची दुसरी चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर आज त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. रुग्णालयातून बाहेर पडताना त्यांनी हात उंचावून आणि हात जोडून रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स, नर्स आणि इतर कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त केले. मुंडे यांच्यासोबत कोरोनाची लागण झालेले त्यांचे खासगी सचिव तसेच आणखी एक स्वीय सहाय्यक, दोन वाहनचालक, एक अंगरक्षक यांनाही रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्या सर्वांची दुसरीही चाचणी निगेटिव्ह आली आहे. आता केवळ एक अंगरक्षक आणि एक कुक हे दोघेच जण रुग्णालयात उपचार घेत असून त्यांची प्रकृती ही सुधारत आहे. यावेळी आपल्या सर्वांच्या सदिच्छा आणि प्राथनेमुळे माझी ही दुसरी चाचणी निगेटिव्ह आली असून डिस्चार्ज मिळाल्यामुळे मी ही मुंबईवरून गावी जात असल्याचे धनजंय मुंडे यांनी सांगितले.

हेही वाचा –

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -