आज मध्यरात्री ठाणे स्थानकात विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक

Special traffic and power block at Thane station at midnight today
आज मध्यरात्री ठाणे स्थानकात विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक

मध्य रेल्वे २० नोव्हेंबर २०२१ च्या मध्यरात्री (शनिवार/रविवार रात्री) दोन ओएचई क्रेन वापरून अप धिम्या मार्गापासून ते डाउन जलद मार्गापर्यंत असलेला ठाणे स्थानकावरील जुना सार्वजनिक फूट ओव्हर ब्रिज हटवण्यासाठी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक परिचालीत करणार आहे. हा ब्लॉक ०१.१० वाजल्यापासून ते ०४.४० वाजेपर्यंत परिचालीत केला जाईल, ज्यामुळे ट्रेन चालण्याचा पॅटर्न खालीलप्रमाणे असेल.

२१ नोव्हेंबर २०२१ रोजी खालील उपनगरीय सेवा रद्द 

T-1 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून मध्यरात्री १२.२८ वाजता ठाणेकरीता सुटणारी उपनगरीय गाडी.
T-4 ठाणे येथून ०५.१६ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकरीता सुटणारी उपनगरीय गाडी.

२१ नोव्हेंबर २०२१ रोजी उपनगरीय सेवांचे सुरूवातीच्या स्थानकातील बदल
T-2 ठाणे लोकल कुर्ला येथून ०४.२६ वाजता सुटेल.
CTL-1 टिटवाळा लोकल मुंब्रा येथून ०५.२५ वाजता सुटेल.

दिवा येथून ०३.४८, ०४.१५ आणि ०४.३४ वाजता सुटणाऱ्या अप धिम्या मार्गावरील सेवा दिवा ते मुलुंड पर्यंत अप जलद मार्गावर वळविण्यात येतील आणि त्या मुंब्रा आणि कळवा स्थानकावर थांबणार नाहीत.या विशेष मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीर आहे.


हे ही वाचा – sabrimala temple : अतिवृष्टीमुळे अयप्पा सबरीमाला मंदिर बंद, तीर्थयात्राही स्थगित