घरमुंबईलोकल सुरू करण्यासाठी राज्य सरकारची केंद्राकडे मागणी

लोकल सुरू करण्यासाठी राज्य सरकारची केंद्राकडे मागणी

Subscribe

अत्यावश्यक सेवा देणाऱ्या लोकांसाठी रेल्वे सेवा सुरू करायला केंद्राने परवानगी द्यावी अशी मागणी राज्य सरकारने केंद्राकडे केली आहे.

जीवघेण्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. मात्र या लॉकडाऊनच्या नियमांमध्ये काहीशी शिथिलता आणत देश पुन्हा अनलॉक होण्याच्या मार्गावर आहे. कोरोनामुळे गेल्या अडीच महिन्यांपासून बंद असलेली रेल्वे सेवा सुरू करण्यासाठी राज्य सरकारने हालचाल सुरू केली आहे. अत्यावश्यक सेवा देणाऱ्या लोकांसाठी रेल्वे सेवा सुरू करायला केंद्राने परवानगी द्यावी अशी मागणी राज्य सरकारने केंद्राकडे केली आहे. सध्या एसटी आणि बेस्टवर पडणारा ताण बघता केंद्राने रेल्वे सुरू करावी, अशी मागणी परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली आहे.

राज्य सरकारचं केंद्राला साकडं

मिळालेल्या माहितीनुसार, परिवहन मंत्री अनिल परब यांनी लोकल सेवा सुरू करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाला राज्य सरकारने पत्र लिहिल्याचे सांगितले आहे. अत्यावश्यक सेवेतील नागरिकांची संख्या सर्वाधिक आहे. त्यांना एसटीने प्रवास करणे कठिण होत असून एसटीपेक्षा रेल्वेने लवकर कामाच्या ठिकाणी पोहोचता येणे शक्य होते आणि त्यामुळे अधिकचा लागणार प्रवासाचा वेळ वाचतो. त्यामुळे रेल्वे मंत्रालयाने लोकल सेवा सुरू करावी, अशी मागणी अनिल परब यांनी केली.

- Advertisement -

लोकल सेवा सुरू व्हावी म्हणून आम्ही रेल्वे मंत्रालयाच्या संपर्कात असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही त्यासाठी प्रयत्न करत आहेत. किमान अत्यावश्यक सेवेतील कामगारांसाठी तरी लोकल सेवा सुरू करण्यात यावी, यासाठी हा प्रयत्न असल्याचे देखील अनिल परब यांनी यावेळी सांगितले.

कर्मचाऱ्यांसाठी ज्यादा एसटी बसेसची सोय

यावेळी परब यांनी अशीही माहिती दिली की, कल्याण-डोंबिवली आणि वसई-विरार येथून मुंबईत कामावर येणारा कर्मचारी वर्ग आधिक आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारीही या भागात मोठ्या प्रमाणात राहतात. त्यामुळे या सर्व कर्मचाऱ्यांना मुंबईत कामावर येण्यासाठी ज्यादा एसटी बसेस सोडण्यात येणार आहेत.

- Advertisement -

एसटी आणि बसेसही अपुऱ्या

दरम्यान, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमामुळे बस आणि एसटीमध्ये अर्ध्याच प्रवाशांना प्रवास करण्याची परवानगी असल्याने प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे. शिवाय एसटी आणि बसेसही अपुऱ्या पडत असल्याने राज्य सरकारने रेल्वे सुरू करण्यासाठी केंद्राला साकडे घातल्याचे सांगितले जात आहे.


एटीएम मशीनमधून चोरलेली रक्कम मोटारसायकालच्या डिक्कीत
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -