ठाकरे सरकारमधील आणखी एक मंत्री कोरोना पॉझिटिव्ह; ट्विटवरून दिली माहिती

Higher & Technical Education Minister Uday Samant
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण झाली आहे. उदय सामंत गेल्या दहा दिवसांपासून विलगीकरणात आहेत. त्यांनी स्वत: ट्विट करून याबाबत माहिती दिली. उदय सामंत यांनी आपली प्रकृती चांगली असल्याचे सांगितले असून आपल्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच पुढील आठवड्यात जनतेच्या सेवेत रुजू होणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. यापूर्वी ठाकरे सरकारमधील अनेक मंत्र्यांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. गेल्याच आठवड्यात नगरविकास मंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे कोरोनाबाधित झाल्याचे सांगण्यात आले होते.

काय म्हटले आहे ट्विटमध्ये 

गेले दहा दिवस स्वतः विलगिकरणात आहे. मी स्वतः कोविड टेस्ट करून घेतली. रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मी गेल्या १० दिवसांत कोणाच्याही संपर्कात नसल्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता अगदी कमी आहे. तरीही माझ्या संपर्कात आलेल्यानी काळजी घ्यावी. मी ठणठणीत आहे पुढच्या आठवड्यात जनतेच्या सेवेत रुजू होणार.

दरम्यान, ठाकरे सरकारमधील मंत्री जितेंद्र आव्हाड, अशोक चव्हाण, धनंजय मुंडे, अस्लम शेख यांना करोनाची लागण झाली होती. त्यातून बरे होऊन हे तिन्ही मंत्री पुन्हा कामाला लागले आहेत. तर, एकनाथ शिंदे यांनाही कोरोनाची लक्षणं जाणवल्यानंतर कोरोनाची चाचणी केली त्यानंतर एका दिवसात या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

हेही वाचा –

नवाज शरीफ भारताचे एजंट, पंतप्रधान नरेंद्र मोदींशी होते गुप्तपणे चर्चा?