घरमुंबई५५ वर्षीय महिलेवर ब्रेन क्रॅनिओटॉमीची यशस्वी शस्त्रक्रिया

५५ वर्षीय महिलेवर ब्रेन क्रॅनिओटॉमीची यशस्वी शस्त्रक्रिया

Subscribe

डोंबिवलीच्या एसआरव्ही ममता हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी एका महिलेवर ती शुद्धीत असताना तिच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे.

कुठल्याही प्रकारची शस्त्रक्रिया करायची असल्यास त्या व्यक्तीला आधी बेशुद्ध केल जातं. पण, डोंबिवलीच्या एसआरव्ही ममता हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी एका महिलेवर ती शुद्धीत असताना तिच्यावर शस्त्रक्रिया केली आहे. एसआरव्ही ममता हॉस्पिटलमधील (डोंबिवली) सल्लागार मेंदूविकारशल्यचिकित्सक डॉ. अभिजीत कुलकर्णी यांनी ५५ वर्षीय अनिता चाळके यांच्या मेंदूवर त्या पूर्ण शुद्धीत असताना गुंतागुंतीची ब्रेन ट्युमर शस्त्रक्रिया केली असून ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. त्यांच्या मेंदूतील क्रियाशील विभागांना नुकसान पोहोचू नये आणि हातापायांच्या हालचालींवर परिणाम होऊ नये हा यामागील हा हेतू होता.

असे झाले निदान

अनिता चाळके या स्तनांच्या कर्करोगाशी लढा देऊन त्या सामान्य आयुष्य जगत होत्या. अलीकडे अचानक त्यांना डोकेदुखीचा त्रास जाणवू लागला. त्यांना असह्य वेदना आणि आकडीचा त्रास होत होता. त्यामुळे, त्यांनी पुढील उपचारांसाठी एसआरव्ही ममता हॉस्पिटलमधील डॉक्टरांची भेट घेतली. त्यांच्या तपासणीदरम्यान एमआरआय अहवालात मेंदूमध्ये ट्युमर असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानंतर या महिलेच्या ब्रेन क्रॅनिओटॉमीची यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे.

- Advertisement -

हा ट्युमर १.५-२ सेमी आकाराचा होता आणि तो ग्रॉस मोटर भागात होता. मेंदूतील हा भाग वाचा, दृष्टी आणि हातपायांच्या हालचालीवर नियंत्रण ठेवतो. अशा परिस्थितीत ब्रेन ट्युमर काढण्यासाठी रुग्णाने शुद्धीत असणे आवश्यक असते. जेणेकरून शस्त्रक्रियेच्या प्रत्येक पायरीवर रुग्णावर होणारा परिणाम जाणवतो. या दोन तास चाललेल्या शस्त्रक्रियेमध्ये वैद्यकीय टीम सक्रियपणे रुग्णाशी संवाद साधत होती. जेणेकरून रुग्णाला जे वाटत आहे ते त्या व्यक्त करू शकतील आणि या दरम्यान हातापायाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठीच्या सूचनांचे पालन करण्यात आले होते. त्यामुळे, शस्त्रक्रिया योग्य दिशेने होत आहे हे रुग्णाच्या प्रतिसादातून स्पष्ट होत होते. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला तिसऱ्या दिवशी डिस्चार्ज देण्यात आला.  – डॉ. अभिजीत कुलकर्णी, मेंदूविकारशल्यचिकित्स

वाचा – दोन महिन्याच्या मुलीवर यशस्वी रित्या शस्त्रक्रिया

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -