घरमुंबईपुरुषांपेक्षा महिला अधिक समजूतदार! सर्वेक्षणातून स्पष्ट!

पुरुषांपेक्षा महिला अधिक समजूतदार! सर्वेक्षणातून स्पष्ट!

Subscribe

कामाच्या ठिकाणी महिलांपेक्षा पुरुषांना राग जास्त अनावर होतो असं एका सर्वेक्षणातून समोर आलं आहे.

शहरांमध्ये कामाच्या ठिकाणी होणाऱ्या एकूण ताण तणाव आणि चिडचिडेपणा यामध्ये पुरुषांच्या तुलनेत महिला कर्मचारी अधिक समंजसपणे परिस्थिती हाताळतात, असे एका सर्वेक्षणात दिसून आले आहे. टाटा सॉल्ट लाइटने केलेल्या ‘एज ऑफ रेज’ या महत्त्वाच्या सर्वेक्षणात हा निष्कर्ष समोर आला आहे. कामाच्या ठिकाणी तणावाचे प्रसंग रोजचे असले तरी, याबाबत राग व्यक्त करण्याचे आणि जाणूनबुजून चुका करण्याचे प्रमाण स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांमध्ये अधिक आहे.

पुरुषांचा राग होतो अनावर!

या सर्वेक्षणाच्या निष्कर्षांनुसार, सर्वेक्षणामध्ये सहभागी झालेल्या महिलांमधील पाचपैकी एका महिलेच्या दृष्टीने (२०%) कामाशी संबंधित समस्या हे संतापाचे मुख्य कारण असले तरी, अनपेक्षित काम पाहिल्यावर संतापाने राग अनावर होण्याचे प्रमाण पुरुषांमध्ये अधिक आहे. कामाच्या दिवशी बॉसने जादा काम करायला सांगितले तर ६४% पुरुषांचा संताप होतो, तर या तुलनेत स्त्रियांमध्ये याचे प्रमाण ५८% आहे. बॉसने शुक्रवारी कामासाठी थांबवून घेतल्यास ५७% पुरुषांचा रागाने भडका उडतो, तर या बाबतीत महिलांचे प्रमाण ५२% आहे. याबरोबरच, वाहतूक कोंडीमुळे कामाला जायला उशीर झाला तर ५७% पुरुषांचा संयम सुटून वाहतूक पोलिसांशी किंवा अन्य चालकांशी भांडण होते, तर या तुलनेत महिलांचे प्रमाण ५५% आहे.

- Advertisement -

सध्याच्या काळात महिला विविध प्रकारच्या भूमिका बजावतात. आई, गृहिणी, मुलगी आणि वर्किंग प्रोफेशनल म्हणून त्या धावपळीचे जीवन जगत असतात आणि त्यांच्या बाबतीत तणाव सर्रास आढळतो. कमतरता किंवा अति-खाणे यामुळे मानसिक आणि शारीरिक ताण वाढत असल्याने आरोग्यपूर्ण, पुरेसा आहार घेऊन संतुलन साधणे आवश्यक असल्याचे डॉ. राजेश पाधी सांगतात.

महिलांनी हायपरटेन्शन कसे नियंत्रित करायचे?

हायपरटेन्शन नियंत्रित करण्याचा एक उपाय म्हणजे लो सोडिअम सॉल्टचे सेवन करणे. लो सोडिअम सॉल्ट रिफाइंड, आयोडाइज्ड असते आणि त्यामध्ये पोटॅशिअमचे प्रमाण अधिक असते. अन्य नियमित मिठांच्या तुलनेत त्यामध्ये सोडिअम कमी असते.

- Advertisement -

हेही वाचा – महिलांची ऑफिसनजीक घराला पसंती, तर पुरूषांची बजेटला!

सर्वेक्षणामध्ये सहभागी झालेले पुरुष आणि स्त्रिया यांच्यामध्ये ६६% पुरुष आणि ६४% महिला यांना दिवसातून एकदा किंवा एकापेक्षा जास्त वेळा कोणत्या ना कोणत्या कारणाने राग येतो. ३५% महिलांच्या तुलनेत ४३% पुरुष ऑफिसमधील सहकाऱ्यांवर किंवा बाहेरील व्यक्तींवर राग काढतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -