घरमुंबईआता भिडे गुरुजी सुषमा अंधारेंच्या निशाण्यावर; अमृता फडणवीसांच्या मुद्द्यावरुन टीका

आता भिडे गुरुजी सुषमा अंधारेंच्या निशाण्यावर; अमृता फडणवीसांच्या मुद्द्यावरुन टीका

Subscribe

टिकली न लावणाऱ्या मुंबईतील महिला पत्रकाराला भिडे गुरूजींनी हटकले होते.  टिकली लावली नाही म्हणून मी प्रतिक्रिया देणार नाही, असे भिडे गुरुजी म्हणाले होते. आता मंगळसूत्रावरुन अमृता फडणवीस यांनी वक्तव्य केले आहे.  मंगळसूत्र घातल्यावर मला गळा आवळल्यासारखे होते, असे अमृता फडणवीस म्हणाल्या आहेत.  संस्कृती जपणारे भिडे गुरुजी अमृता वहिनींच्या मंगळसुत्रावरील वक्तव्यावर बोलतील का? असा सवाल अंधारे यांनी केला आहे. 

उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांनी मंगळसूत्र घातल्यावर मला गळा आवळल्यासारखे होते, असे वक्तव्य केले आहे. टिकली लावली नाही म्हणून महिला पत्रकाराशी बोलणार नाही, असे म्हणणारे भिडे गुरुजी आता अमृता वहिनींना जाब विचारतील, असा सवाल ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे.

अंधारे म्हणाल्या, टिकली न लावणाऱ्या मुंबईतील महिला पत्रकाराला भिडे गुरूजींनी हटकले होते.  टिकली लावली नाही म्हणून मी प्रतिक्रिया देणार नाही, असे भिडे गुरुजी म्हणाले होते. आता मंगळसूत्रावरुन अमृता फडणवीस यांनी वक्तव्य केले आहे.  मंगळसूत्र घातल्यावर मला गळा आवळल्यासारखे होते, असे अमृता फडणवीस म्हणाल्या आहेत.  संस्कृती जपणारे भिडे गुरुजी अमृता वहिनींच्या मंगळसुत्रावरील वक्तव्यावर बोलतील का? असा सवाल अंधारे यांनी केला आहे.

- Advertisement -

त्या एका सभेत बोलत होत्या. यावेळी त्यांनी शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्यावरही टीका केली. त्या म्हणाल्या, भोंडेकर यांचे वडील साधे कारकून होते. तरीही आता भोंडेकर यांच्याकडे कोट्यवधींची संपत्ती आहे. आलिशान गाड्या आहेत. बंगला आहे. सहा प्लाॅट आहेत. मेडिकल काॅलेज आहे. त्यांनी सरकारकडून सुमारे ६ कोटी रुपयांचे अर्थ सहाय्य घेऊन फॅक्टरी उभारली. ती फॅक्टरी सध्या बंद आहे. तेथे रिसाॅर्ट उभे आहे, असा दावा सुषमा अंधारे यांनी केला.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत केलेल्या वक्तव्याचाही अंधारे यांनी समाचार घेतला. त्या म्हणाल्या, राज्यपाल कोश्यारी यांनी शिवरायांचा अवमान केला आहे. त्याचे राज्यभर पडसाद उमटत आहेत. राज्यपाल यांच्या विरोधात कारवाईसाठी पुढाकार घेणे गरजेचे असताना राज्यकर्ते मात्र गप्प का? असा मुद्दाही अंधारे यांनी उपस्थित केला.

- Advertisement -

एकनाथ शिंदे यांनी बंड करुन स्वतंत्र गट स्थापन केला. भाजपशी हातमिळवणी करुन सत्ता स्थापन केली. तेव्हापासून शिंदे गट आणि ठाकरे गट असा संघर्ष सुरू झाला. दोन्ही गटात आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत.

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -