घरमुंबईठाणे महापालिकेने बाईक रॅलीतून दिला पर्यावरण वाचवण्याचा संदेश!

ठाणे महापालिकेने बाईक रॅलीतून दिला पर्यावरण वाचवण्याचा संदेश!

Subscribe

आज महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून ‘स्वच्छता ही सेवा’ या मोहिमेंतर्गत पेट रॅली, तलावांची स्वच्छता मोहीम आणि कार्यालय स्वच्छता आदी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

नागरीकांनी प्लास्टिकचा वापर बंद करावा तसेच ठाणे शहर प्लस्टिक मुक्त करावे, असा संदेश बाईक रायडर्सच्या माध्यमातून आज देण्यात आला. ठाणे महानगरपालिकेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या जनजागृतीपर बाईक रॅलीत आरफोरमसी बाईक रायडर्स, महापालिका अधिकारी, कर्मचारी तसेच परिवहन सेवेचे सुमारे १५० हून आधिक बाईकस्वार सहभागी झाले होते. दरम्यान आज महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून ‘स्वच्छता ही सेवा’ या मोहिमेंतर्गत पेट रॅली, तलावांची स्वच्छता मोहीम आणि कार्यालय स्वच्छता आदी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

गांधी जयंती निमित्त ‘स्वच्छता ही सेवा’ कार्यक्रम

‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत महात्मा गांधी यांच्या १५० जयंतीनिमित्ताने केंद्र सरकारमार्फत ११ सप्टेंबरपासून २ ऑक्टोबरपर्यंत राबविण्यात येणाऱ्या ‘स्वच्छता ही सेवा’ या उपक्रमांतर्गत आज ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून शहराच्या वेगवेगळ्या भागांत प्लास्टिक बंदीविषयक विविध कार्यक्रम आज राबविण्यात आले. या कार्यक्रमाची सुरुवात मोटार सायकल रॅलीने झाली. ठाणे महानगरपालिका भवन येथून सुरुवात होवून पुढे नितीन जंक्शन – काशीनाथ घाणेकर, नाट्यगृह – हॅपी व्हॅली – मानपाडा – कापूरबावडी – तलाव पाळी या मार्गे राम गणेश गडकरी रंगायतन येथे या रॅलीची सांगता करण्यात आली.

- Advertisement -

हेही वाचा – मुंबई उपनगरातील मतदान यंत्रांचे रॅन्डमायझेशन!

प्लास्टिक मुक्त ठाण्याची शपथ घेतली

दरम्यान या मोहिमेची सुरुवात महापालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे महात्मा गांधी व यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी एकदा वापर करून टाकून देण्यात येणारे प्लास्टिक मी वापरणार नाही. मी स्वतः आणि दुसऱ्यांना सुद्धा प्लास्टिकचा पुनर्वापर जाण्यासाठी प्रोत्साहित करेन आणि आपले ठाणे शहर प्लास्टिक मुक्त करण्याचा प्रयत्न करेन ही आज शपथ घेण्यात आली. शहरातील सर्व घाट, तलावांच्या ठिकाणी सकाळी स्वच्छता रॅली राबविण्यात आली. यामध्ये परिसर स्वच्छ करून स्वच्छतेचे संदेश देत रॅली काढण्यात आली. यामध्ये माध्यमिक शाळेतील विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला.

जनजागृतीपर रॅलीत विद्यार्थ्यांचा सहभाग

ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व महापालिका शाळा, अनुदानित शाळा तसेच खाजगी शाळेतील विद्यार्थी देखील या ‘स्वछता हीच सेवा’ या मोहिमेत सहभागी झाले होते. ‘प्लास्टिक वापर टाळा, स्वच्छ ठाणे सुंदर ठाणे,’ असे नारे देत सर्व शाळेतील विद्यार्थी प्लास्टिक वापराबाबतच्या जनजागृती रॅलीत सहभागी झाले. ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने स्वामीनारायण सभागृहामध्ये शहरातील डॉक्टरांना टीबी आणि कृष्ठरोग या आजरासंबंधी सातत्यपूर्ण वैद्यकिय शिक्षण आज देण्यात आले. या उपक्रमाला देखील डॉक्टर्स मंडळींनी चांगला प्रतिसाद दिला. शहरातील रस्त्यावर पडलेले प्लास्टिक बऱ्याच वेळा जनावरे, पाळीव प्राणी खातात. रस्त्यावर टाकल्या जाणाऱ्या प्लास्टिकमुळे प्राण्यांना होणाऱ्या इजेला आळा बसावा म्हणून नागरिकांनी, ‘कोणत्याही प्रकारच्या प्लास्टिकचा वापरू नये तसेच प्लास्टिक रस्त्यावर टाकू नये’ यासाठी शहरातील प्राणी प्रेमी आपल्या पाळीव कुत्र्यांसोबत या रॅलीत सहभागी झाले.शहरातील गृहसंकुलांनीदेखील या जनजागृतीपर रॅलीत सहभाग घेतला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -