घरमुंबईदोन लाखांची रक्कम प्रवाशाला केली परत

दोन लाखांची रक्कम प्रवाशाला केली परत

Subscribe

रिक्षा चालकाचा प्रामाणिकपणा

रिक्षात प्रवास करताना गडबडीने एका प्रवाशाची पैशाने भरलेली बॅग रिक्षात विसरली. ती बॅग रिक्षा चालकाने पोलिसांच्या ताब्यात दिली. या बॅगेत दोन लाख रुपयांची रोख रक्कम होती. रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणामुळे बॅग मालकाला त्याची रोख रक्कम मिळाली. ही घटना कामोठे वसाहती मध्ये घडली आहे. सूर्यकांत मारूती भोपी (राहणारे कामोठे गाव) असे प्रामाणिक रिक्षा चालकाचे नाव आहे. सूर्यकांत भोपी कामोठे वसाहतीमध्ये रिक्षा चालवून आपल्या कुटूंबांचा उदरनिर्वाह करतात.

भोपी हे नेहमी कामोठे वसाहतीमध्ये स्टेशन ते हायवे मार्गावर रिक्षा चालवतात. भोपी यांच्या रिक्षात मानसरोवर स्टेशन वरून एक प्रवासी बसला. त्याच्या हातात बॅग होती. तो पुढे कामोठे पोलीस ठाण्याच्या चौकात उतरला आणि रिक्षाभाडे दिले. हा प्रवासी आपली बॅग रिक्षातच विसरला होता. भोपी त्यानंतर रिक्षा घेऊन घरी गेले. घराजवळ रिक्षा लावत असताना त्यांना गाडीत बॅग आढळली, त्यांनी बॅग उघडून पाहिले असता त्यात रोख रक्कम होती. त्यांनी तात्काळ कामोठे पोलीस स्टेशन गाठून पैशांची बॅग पोलिसांच्या ताब्यात दिली आणि एक प्रवासी बॅग विसरल्याचे सांगितले. ही बॅग पोलिसांना देऊन ते निघून गेले. त्यानंतर कामोठे पोलिसांनी प्रवाशाचा शोध घेऊन त्याला बॅग परत केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -