घरमुंबईकेमोथेरपीवर अणूऊर्जा उपचार पद्धतीचा पर्याय

केमोथेरपीवर अणूऊर्जा उपचार पद्धतीचा पर्याय

Subscribe

भारतात कर्करोग उपचारांसह निदानासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे.

भारतात कर्करोग उपचारांसह निदानासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. निदानासाठी देशातील पेट सीटी तंत्रज्ञान जगात सर्वात स्वस्त आहे. त्याची मागणी मोठी असून येत्या काळात खासगी कंपन्याही या क्षेत्रात उतरणार असल्याची माहिती टाटा स्मारक रुग्णालयाचे डॉ. व्यंकटेश नटराजन यांनी दिली. अणुऊर्जा भवन येथे झालेल्या परिषदेत अणुक्षेत्रातील तज्ज्ञ उपस्थित होते. कर्करुग्णाच्या शरीरातील अनावश्यक पेशी नष्ट करताना इतर आवश्यक पेशीही नष्ट होतात. पण, या आवश्यक पेशी कायम ठेवून कर्करोगाच्याच पेशी अणु उपचार पद्धतीने नाहीसे करण्याचे संशोधन यावेळी सादर करण्यात आले. बोर्ड ऑफ रेडिओ अॅण्ड आयसोटोप टेक्नोलॉजी म्हणजेच ब्रीटकडून हे संशोधन शोधण्यात आले. यावर तज्ज्ञ विचार मांडत होते.

थायरॉइडमधून होणाऱ्या कर्करोगावर अणुऊर्जा उपचार

थायरॉइडमधून होणाऱ्या कर्करोगावर अणुऊर्जा उपचार म्हणून वापरण्यात आली आहे. तर, स्तनाचा कर्करोग आणि रक्ताच्या कर्करोगावरील उपचारांसाठी अणुऊर्जेचा उपचार पद्धतीचे संशोधन सुरु असल्याची माहिती भाभा अणुऊर्जा संशोधन केंद्रातील रेडिएशन उपचार केंद्राचे डॉ. संदीप बासू यांनी दिली.

- Advertisement -

रेडिओ किरणांद्वारे होणाऱ्या उपचारांवर संशोधन 

रेडिओ किरणांद्वारे होणाऱ्या या उपचार पद्धतींवर ब्रीटमध्ये भाभा अणु संशोधन केंद्राच्या रेडिओ फार्मास्युटीकल्स विभागात प्राधान्याने संशोधन सुरू आहे. ही उपचार पद्धती कमी खर्चात, त्रास कमी देणारी आणि अचूक उपचार करणारी अशी आहे. यात अणु भट्टीमध्ये या किरणांची निर्मिती केली जाते. त्याचा पुरवठा देशातील ३०० उपचार केंद्रांना केला जात असल्याचे ब्रीटचे अनुपम माथूर यांनी सांगितले. कर्करोगावरील उपचारांसाठी आवश्यक किरणोत्सर्गाची देशातील ८० टक्के मागणी पुरवण्यास सध्याची यंत्रणा समर्थ असल्याचेही माथूर यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -