घरमुंबईसफाई कर्मचारी तरुणाची हत्या

सफाई कर्मचारी तरुणाची हत्या

Subscribe

आग्रीपाडा येथे मोहम्मद शकील उर्फ सय्यद अली या 22 वर्षांच्या सफाई कर्मचारी तरुणाची काही अज्ञात व्यक्तींनी हत्या केली. हत्येनंतर मारेकर्‍यांनी पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी आग्रीपाडा पोलिसांनी हत्येसह हत्येचा पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवून पळून गेलेल्या मारेकर्‍यांचा शोध सुरू केला आहे. या हत्येमागील कारण समजू शकले नाही असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम आगवणे यांनी सांगितले.

आग्रीपाडा येथील नायर रोड, टोपास सहकारी सोसायटीमध्ये ऑलिव्ह ट्रेड अ‍ॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड नावाची एक कंपनी आहे. याच कंपनीत मोहम्मद शकील हा सफाई कर्मचारी म्हणून कामाला होता. शुक्रवारी दुपारी तीन वाजता हैदर अब्दुल शाहिद सय्यद यांना मोहम्मद शकील हा रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी आग्रीपाडा पोलिसांना ही माहिती दिली होती. या माहितीनंतर घटनास्थळी गेलेल्या पोलिसांनी मोहम्मद शकीलला तातडीने जवळच्या नायर हॉस्पिटलात दाखल केले होते, तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.

- Advertisement -

प्राथमिक तपासात मारेकर्‍यांनी हत्येनंतर पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. ही हत्या कोणी आणि का केली याचा उलघडा होऊ शकला नाही, मात्र परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तसेच तांत्रिक माहितीवरून मारेकर्‍यांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -