घरCORONA UPDATECoronaEffect: …तर किराणा मालाची दुकाने बंद करावी लागतील!

CoronaEffect: …तर किराणा मालाची दुकाने बंद करावी लागतील!

Subscribe

मुंबईसह आसपासच्या शहरांमध्ये नवी मुंबईतील घाऊक मार्केटमधून धान्य व इतर वस्तू येत असतात. परंतु सध्या तिथूनच आवक कमी झाल्यामुळे अनेक किराणा मालाच्या दुकानांमधील सामान संपू लागले आहेत.

संपूर्ण मुंबईसह राज्यात लॉकडाऊन करण्यात आल्यानंतर केवळ किराणा मालासह भाजीपाल्यांची दुकाने तसेच औषधे आणि अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरु आहे. मात्र, मुंबईसह आसपासच्या शहरांमध्ये नवी मुंबईतील घाऊक मार्केटमधून धान्य व इतर वस्तू येत असतात. परंतु सध्या तिथूनच आवक कमी झाल्यामुळे अनेक किराणा मालाच्या दुकानांमधील सामान संपू लागले आहेत. त्यामुळे एक-दोन दिवसांमध्ये जर मालच न आल्यास किराणा मालाची दुकाने बंद करावी लागतील, अशी भीती आता दुकानदारांकडून व्यक्त केली जात आहे.

‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यात आणि देशात लॉकडाऊन झाल्यानंतर केवळ किराणा माल, भाजीपाला आणि औषधांची दुकाने सुरु आहेत. ही सर्व दुकाने प्रत्येक दिवशी खुली राहतील. त्यामुळे नागरिकांनी घरातील जीवनावश्यक वस्तूंसह इतर आवश्यक सामान भरावे. आवश्यकतेपेक्षा जास्त सामान भरु नये, आवाहन सरकारच्या माध्यमातून केले जात आहे. त्यामुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात पुढील काही दिवसांचा साठा करून ठेवला आहे.

- Advertisement -

एका बाजूला जीवनावश्यक वस्तूंची मागणी वाढत आहे. मात्र, दुसरीकडे याची आवकच कमी झाल्यामुळे दुकानांमधील किराणा वस्तूंचा साठा कमी होवू लागला आहे. तर काही दुकानांमध्ये अनेक वस्तूंचा साठाही संपलेला आहे. त्यामुळे अनेकदा दुकानांमध्ये येणाऱ्या ग्राहकांची मागणी दुकानदार पूर्ण करू शकत नाही. परिणामी वस्तू खरेदीअभावी ग्राहकांना रिकाम्या हाताने मागे फिरावे लागत आहे.

मालाची ने-आण होत नसल्याने दुकान रिकामी 

नालासोपारा येथील सर्व छोट्या-मोठ्या दुकानांना किराणा मालाचा पुरवठा करणाऱ्या महादेव ट्रेडर्स या घाऊक दुकानदाराच्या मते, नवी मुंबईतून किराणा मालाच्या वस्तूंची ऑर्डर दिलेली आहे. परंतु वाहतूक करण्यास आणि सामान वाहून नेणारा माथाडी कामगार नसल्यामुळे या वस्तू उपलब्ध होत नाही. त्यामुळे जर वाहतूक आणि माल वाहून नेणारा कामगारच नसेल तर होलसेल दुकानदार या मालाची पाठवणी कशी करणार असा प्रश्न आहे. माल वाहतूक करणारे ट्रक मालक आणि चालक कोरोनामुळे रस्त्यावर वाहने उतरवण्यास तयार नाहीत. तर माथाडी कामगारही येत नाही. त्यांच्या पाठिशी त्यांची युनियन कायम आहे. युनियननेही कामगारांची जबाबदारी उचलल्यामुळे कामगार माल वाहून नेण्यासाठी येत नाही. त्यामुळे ट्रान्सपोर्ट आणि माथाडी कामगारांमुळे सध्या अनेक दुकानांना माल पुरवठा करणे शक्य होत नाही. अनेक दुकानांमधील किराणा माल संपत चालला आहे. जर दुकानांमध्येच जर मालवस्तू नसल्यास दुकाने उघडी ठेवून काय उपयोग असा विचार करत अनेक दुकानदारांनी दुकाने बंद ठेवण्याशिवाय पर्याय उरलेला नाही, असे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा –

Coronavirus: फ्रान्सचे माजी मंत्री पॅट्रिक डेव्हिडजियन यांचा कोरोनाने मृत्यू

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -