घरमुंबईरुग्णालयीन कर्मचाऱ्यांचे बुधवारी सकाळपासूनच आंदोलन

रुग्णालयीन कर्मचाऱ्यांचे बुधवारी सकाळपासूनच आंदोलन

Subscribe

म्युनिसिपल मजदूर युनियनने दिली आंदोलनाची हाक बायोमेट्रीक हजेरीचे परिपत्रक रद्द करा,अन्यथा आंदोलन अटळ

मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी महापालिका रुग्णालयातील सर्व कामगार, कर्मचारी व अधिकाऱ्यांना बायोमेट्रीक हजेरी बंधनकारक करून इतर कर्मचाऱ्यांना सवलत दिल्यामुळे याचे तीव्र पडसाद वैद्यकीय कर्मचाऱ्यांमध्ये उमटू लागले आहेत. त्यामुळे प्रशासनाने याबाबत मंगळवारी जारी केलेले परिपत्रक मागे घेत नाही तसेच रुग्णालयांमधील कर्मचाऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन केले जाईल, असा इशारा म्युनिसिपल मजदूर युनियनचे चिटणीस प्रदीप नारकर यांनी दिला आहे. रुग्णालयांमधील सर्व कामगार, कर्मचारी व अधिकाऱ्यांनी हा एकत्रितपणे हा निर्णय घेतला असून बुधवारी पहिल्या पाळीपासूनच हे बेमुदत आंदोलन पुकारले जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये तसेच आरोग्य खात्यात काम करणाऱ्या सर्व वर्गातील कामगार, कर्मचारी, परिचारिका, अधिकारी व डॉक्टर्स हे आपल्या जीवाची पर्वा न करता मार्च, २०२० पासून कोरोना बाधित रुग्णांची सेवा, शुश्रुषा करीत आहेत, केंद्र आणि राज्य सरकारने कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा विचार करून संसर्ग होऊ नये म्हणून बायोमेट्रिक हजेरी बंद केली, त्याप्रमाणे तत्कालीन महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी साहेब यांनीही महापालिकेतील कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक हजेरी बंद करण्याचा निर्णय घेतला, परंतु विद्यमान महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी रुग्णालय व आरोग्य खात्यातील कर्मचारी, अधिकारी यांना बायोमेट्रिक हजेरी नोंदविणे बंधनकारक राहिल, अशाप्रकारचे परिपत्रक जारी केले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – बायोमेट्रीक हजेरीतून महापालिका कर्मचाऱ्यांची सुटका


रुग्णालय, आरोग्य खात्यातील सर्व संवर्गातील कामगार, कर्मचारी, परिचारिका, अधिकारी व डॉक्टर्स यांना कोरोनाचा धोका नाही, असे महापालिका आयुक्त यांना असे म्हणायचे आहे का? असा सवाल नारकर यांनी केला आहे. त्यामुळे याबाबत त्वरित फेरविचार करून परिपत्रक मागे घेऊन रुग्णालय, आरोग्य खात्यातील कर्मचारी, अधिकारी यांच्यावर होणारा अन्याय दूर करावा. अन्यथा सर्व संवर्गातील कामगार कर्मचारी परिचारिका अधिकारी व डॉक्टर्स उद्या बुधवार, ८ जुलै २०२० रोजी सकाळपासूनच बेमुदत आंदोलन करतील आणि यामुळे होणाऱ्या सर्व परिणामास महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल आणि महापालिका प्रशासनातील अधिकारी हे जबाबदार राहतील असा इशारा प्रदीप नारकर यांनी दिला आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -